धानोरीतील प्रकार : जुन्या जमिनीच्या वादाचा राग मनात धरून केली मारहाण
महाराष्ट्र ३६० न्यूज नेटवर्क
पुणे : गणपती विसर्जन करताना गोंधळ घालू नका असे सांगितल्याच्या रागातून जीवे मारण्याच्या उद्देशाने सिमेंटचे ब्लॉक, बांबू, बिअरची बाटली व लाथाबुक्क्यांनी मारहाण केली. ही धानोरीतील गोकुळ विघ्नहर्ता गणपतीसमोर घडली. याप्रकरणी एकाला अटक केली असून, तीन फरारींचा पोलीस तपास करीत आहेत.
किरण खलसे (वय ३४, रा. गोकुळनगर, विश्रांतवाडी, पुणे) यांनी विश्रांतवाडी पोलीस स्टेशनमध्ये फिर्याद दिली असून, त्यानुसार गुन्हा दाखल केला आहे.
पोलिसांनी सांगितले की, फिर्यादी घरच्या गणपतीचे विसर्जन करीत असताना आरोपी मोठमोठ्याने गोंधळ करीत होते. त्यामुळे फिर्यादीच्या वडिलांनी गोंधळ करू नका, जनावरे दोऱ्या तोडतील असे सांगितल्याचा आणि जमिनीच्या वादातून फिर्यादीच्या पत्नी, वडिल, भाऊ यांना जिवे मारण्याच्या उद्देशाने सिमेंटचे ब्लॉक, लाकडी बांबू, बिअरची बाटली व लाथाबुक्क्यांनी मारहाण केली. शिवीगाळ करून परिसरात दहशत निर्माण केली.
पुढील तपास पोलीस उपनिरीक्षक एस. ए. नरळे करीत आहेत.
