फरासखाना पोलिसांत तक्रार : कसबा पेठेतील भाजीमंडई मटण मार्केटजवळील घटना
महाराष्ट्र ३६० न्यूज नेटवर्क
नाचताना धक्काबुक्की लागल्याच्या रागातून डोक्यात फरशी व कोयत्याने वार करून जखमी करणाऱ्या तिघांवर गुन्हा दाखल केला आहे. ही घटना कसबा पेठेतील भाजीमंडई, मटण मार्केटजवळ घडली.
सूरज दरेकर (वय २५, रा. २०१, मंगळवार पेठ, पुणे) यांनी फरासखाना पोलीस स्टेशनमध्ये फिर्याद दिली असून, त्यानुसार गुन्हा दाखल केला आहे.
पोलिसांनी सांगितले की, फिर्यादी जेवण झाल्यानंतर फेरफटका मारत असताना मित्राला म्हणाला , भाजीमंडई, मटण मार्केटजवळ साऊंड वाजत आहे. चल तेथे आपण जाऊन नाचू असे सांगून दोघे तेथे जाऊन नाचू लागले. गर्दीत धक्काबुक्की झाल्याने फिर्यादी परत येत असताना मित्राने त्याला परत नाचण्यासाठी तेथे नेऊन शिवीगाळ करत हाताने मारहाण केली. त्यावेळी आरोपींनी फिर्यादीच्या डोक्यात फरशी व कोयत्याने वार करून जखमी केले.
पुढील तपास फरासखाना पोलीस स्टेशनचे पोलीस उपनिरीक्षक आर. एन. पवार करीत आहेत.
