अज्ञात चोरट्याविरुद्ध गुन्हा : मुंढव्यातील रामनगरमध्ये चोरीच्या घडल्या घटना
महाराष्ट्र ३६० न्यूज नेटवर्क
पुणे : मुंढव्यातील रामनगरमधून एका रात्रीत दोन मोटारसायकल चोरून नेल्या आणि बिअरशॉपी आणि मेडिकल दुकानाचे शटर उचकटण्याचा प्रकार घडला. ही घटना सोमवारी (दि. २१ सप्टेंबर) रात्री पावणेबारा ते मंगळवारी (दि. २२ सप्टेंबर) सकाळी ६ च्या दरम्यान घडली.
तिरुपथय्या छनचा (वय ३६, रा. रामनगर, मुंढवा, पुणे) यांनी मुंढवा पोलीस स्टेशनमध्ये फिर्याद दिली असून, त्यानुसार गुन्हा दाखल केला आहे.
पोलिसांनी सांगितले की, मुंढव्यातील बी. टी. कवडे रस्त्यालगतच्या रामनगरमधून फिर्यादी आणि त्यांच्या परिचयाचे मल्हारी शिंदे यांच्या लॉक केलेल्या दुचाकी अज्ञाताने चोरून नेल्या. त्यानंतर बीअर शॉपी आणि मेडिकलच्या दुकानाचे शटर उचकटण्याचा चोरट्याने प्रयत्न केला आहे. पुढील तपास मुंढवा पोलीस स्टेशनचे सहायक पोलीस निरीक्षक प्रशांत माने करीत आहेत.
