सहकारनगर पोलिसांची कारवाई : एकावन्न हजारांचा मुद्देमाल जप्त
महाराष्ट्र ३६० न्यूज नेटवर्क
पुणे : आयपीएल क्रिकेटवर सट्टा घेणाऱ्या बुकीचा पर्दाफाश करण्यात सहकारनगर पोलिसांना यश मिळाले असून, एकूण एकावन्न हजारांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे.
दि. २८ सप्टेंबर रोजी तपासपथकाचे प्रभारी अधिकारी पोलीस उपनिरीक्षक सुधीर घाडगे, पोलीस हवालदार बापू खुटवड, पोलीस नाईक सुशांत इंगळे, महादेव नाळे, पोलीस शिपाई शिवलाल शिंदे असे तपासपथकाच्या कार्यालयात हजर असताना, सहकारनगर पोलीस स्टेशनच्या वरिष्ठ पोलीस निरीक्षक स्वाती देसाई यांनी त्यांच्या कार्यालयात बोलावून घेऊन आदेशित केले की, भारती विद्यापीठ पोलीस स्टेशनकडील पोलीस उपनिरीक्षक नितीन शिंदे, पोलीस हवालदार भोसले, पोलीस शिपाई सुळ, शेंडे समक्ष हजर झाले असून, पोलीस उपनिरीक्षक शिंदे यांना त्यांच्या बातमीदारामार्फत खात्रीशीर बातमी मिळाली आहे की, तळजाई पठार धनकवडी पुणे येथील मल्हार जिमशेजारील हिल व्ह्यू सोसायटीतील एका फ्लॅटमध्ये के.के आर. (कोलकाता नाईट रायडर्स ) विरुद्ध डी.सी. (दिल्ली कॅपीटल) या २०-२० आयपीएल सामन्याचे क्रिकेटचे ऑनलाईन बुकिंग (सट्टा) घेतले जात आहे.
सदरची बातमी त्यांनी पोलीस उपआयुक्तांना कळविली असता त्यांनी सहकारनगर पोलीस स्टेशनकडील स्टाफची मदत घेऊन कायदेशिर कारवाई करण्याचे आदेश दिले. बातमीप्रमाणे स्टाफसह सदर ठिकाणी गेले असता, राहुल सुभाष पांडे (वय ४८, धंदा- ऑनलाईन लॉटरी सेंटर, रा. घोरपडे पेठ, खडकमाळ आळी पुणे) हा राहत असलेल्या ठिकाणाहून तीन-चार मोबाईल ठेवून त्याच्या समोर एक टॅब व लॅपटॉप लावून त्याचेवर के. के. आर (कोलकाता नाईट रायडरस) विरुध्द डी.सी. (दिल्ली कंपीटल) या २०-२० आयपीएल सामन्याची क्रिकेट मॅच चालू होती. त्याच्या बाजूस एक वही ठेवलेली होती. त्यात सर्व ऑनलाईन बुकिंग घेतले जात असल्याचे आढळून आले. तो सर्व एकूण ५१.८१० रुपये किमतीचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे.
सदरची कामगिरी ही, अपर पोलीस आयुक्त डॉ. राजेंद्र डहाळे, पोलीस उपायुक्त सागर पाटील, सहायक पोलीस आयुक्त सुषमा चव्हाण, पोलीस निरीक्षक स्वाती देसाई, युनुस मुलाणी (गुन्हे) यांच्या मार्गदर्शनाखाली सहकारनगर तपास पथकाचे पोलीस उपनिरीक्षक सुधीर घाडगे, पोलीस अंमलदार बापू खुटवड, महादेव नाळे, सुशांत फरांदे, भुजंग इंगळे, महेश मंडलिक, सागर शिंदे, प्रदीप बेडीस्कर, सागर सुतकर आणि शिवलाल शिंदे यांनी केली आहे.
