पुण्याच्या ए. डी. कॅम्प चौकातील घटना – क्या नाटक लगाया है” असे बोलून शिवीगाळ केली
महाराष्ट्र ३६० न्यूज नेटवर्क
पुणे : उसने पैसे देण्यास नकार दिल्याने एकाने कोयत्याने डोक्यात वार करुन तरुणाच्या खुनाचा प्रयत्न केला. यावेळी तेथे असलेल्या लोकांना कोयता दाखवून दहशत निर्माण केली. ही घटना ए.डी. कॅम्प चौकातील महाराष्ट्र पान शॉप समोर 30 सप्टेंबर रोजी दुपारी साडेबारा वाजता घडली.
जमीर हुसेन शेख (वय 33, रा. पत्राची चाळ, नाना पेठ) यांनी समर्थ पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. याप्रकरणी समर्थ पोलिसांनी (गु. र. क्र. 170/21) नाजीम नजीर शेख (वय 30, रा. लक्ष्मीनगर, येरवडा) याच्याविरुद्ध 307, 504, 56 सह मपोका 37/1 सह 135 आर्म ॲक्ट 4/25 आणि क्रि. अमेंन्डमेंट.ॲक्ट 7 खाली खुनाचा प्रयत्न केल्याचा गुन्हा दाखल केला आहे.
पोलिसांनी सांगितले की, जमीर शेख हे महाराष्ट्र पान शॉप येथे पाणी पिण्यासाठी आले होते. त्यावेळी त्यांचा तोंड ओळखीचा नाजीम शेख तेथे आला. त्याने फिर्यादी यांना उसने 10 हजार रुपये मागितले. फिर्यादी यांनी ते देण्यास नकार दिल्यामुळे आरोपीने रागाने फिर्यादीला ”तूने क्या नाटक लगाया है” असे बोलून शिवीगाळ केली. आपल्याजवळील लोखंडी कोयता काढून हवेत फिरवून बघत असलेल्या लोकांकडे रोखून ” कोई बीच मे आया तो मार डालुंगा” असे बोलत दहशत निर्माण केली. फिर्यादीस जीवे ठार मारण्याच्या उद्देशाने कोयता डोक्यात मारुन गंभीर जखमी केले. पोलीस उपनिरीक्षक हाळे तपास करीत आहेत.
