बार्शी तालुका पोलीस ठाण्याची कारवाई : चोवीस लाखांचा मुद्देमाल जप्त
महाराष्ट्र ३६० न्यूज नेटवर्क
बार्शी : बार्शी तालुका पोलीस ठाणे हद्दीत शेतमालाच्या चोरीच्या नऊ घटना उघडकीस आणून एकूण चौवीस लाखांचा मुद्देमाल जप्त करण्यात बार्शी तालुका पोलिसांना यश मिळाले असून, या प्रकरणी एकाला ताब्यात घेण्यात आले आहे.
बार्शी तालुका पोलीस ठाणे हद्दीत वाढत्या चोरी व शेत मालाच्या चोरीच्या घटनामुळे सोलापुर ग्रामीणच्या पोलीस अधीक्षकांनी सदर गुन्हे उघडकीस आणणेबाबत सूचना केल्या होत्या. त्या अनुषंगाने प्रभारी अधिकारी यांनी पोलीस सबइन्स्पॅक्टर प्रवीण जाधव, पोलीस नाईक अभय उंदरे, अमोल माने, पोलीस कॉन्सेटबल धनराज फत्तेपुरे यांचे विशेष पथक नेमण्यात आले.
पोलीस नाईक उंदरे यांना मिळालेल्या गोपनीय बातमीद्वारे व पोलीस कॉन्सेटबल धनराज फत्तेपुरे, रतन जाधव (सायबर सेल) यांनी तांत्रिक विश्लेषणामुळे आरोपी निष्पण करून आरोपी माणिक गुलाब काळे (वय ३०, रा. कासारखाणी ता. वाशी, जि. उस्मानाबाद) यांच्यावर वॉच ठेवून, सदर आरोपी हा वाशी गावाचे बाजारपेठेत खरेदी करण्यासाठी येणार आहे, अशी गोपनीय माहिती मिळाली होती. आरोपी माणिक काळे यास दिनांक २९ सप्टेंबर रोजी ताब्यात घेऊन तपास केला असता, त्यांचे इतर तीन साथीदारांच्या मदतीने बार्शी तालुका पोलीस ठाण्याच्या हद्दीत एकूण नऊ गुन्हे केल्याचे कबूल केले.
सदर नऊ गुन्ह्यांतील मोबाईल टॉवरच्या बॅटऱ्या, इलेक्ट्रिक पोलवरील तारा, मूग, उदीड, पेरणी यंत्र, ढोकी पोलीस ठाणे कडील १० टायरचा टिपर असा एकूण २४,०८४२४ रुपये किमतीचा माल जप्त करण्यात आलेला आहे.
सदरची कामगिरी ही, पोलीस अधीक्षक तेजस्वी सातपुते, अपर पोलीस अधीक्षक हिंमत जाधव, स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखेचे पोलीस निरिक्षक सर्जेराव पाटील, बार्शी उपविभागीय पोलीस अधिकारी धाराशिवकर यांच्या मार्गर्शनाखाली सहायक पोलीस निरीक्षक शिवाजी जायपत्रे, पोलीस कॉन्सेटबल प्रवीण जाधव, फौजदार शेख, धनराज फत्तेपुरे, बळीराम बेदरे, सुरेश बिरकले, खोकले, मेहेर, वैभव भांगे, समीर पठाण, पोलीस हेडकॉन्स्टेबल सुभाष सुरवसे, गोरख भोसले, राजेंद्र मंगरुळे, गायकवाड, दशरथ बोबडे, पोलीस नाईक अमोल माने, अभय उंदरे, तानाजी धिमधिमे, केसरे, केकाण यांनी केली आहे.
