चौघांवर गुन्हा : पुण्यातील चतुःश्रृंगी परिसरातील घटना
महाराष्ट्र ३६० न्यूज नेटवर्क
पुणे : दरमहा 10 हजार रुपयांचा हप्ता देण्याची मागणी करुन दुकानदाराला कोयत्याने मारहाण करुन खिशातील 2 हजार रुपये जबरदस्तीने घेऊन जाण्याचा प्रकार समोर आला आहे.
याप्रकरणी सौरभ मुरकुटे (वय 21, रा. पिंपळे निलख) यांनी चतु:श्रृंगी पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. त्यानुसार पोलिसांनी आकाश ऊर्फ सोन्या संजय क्षीरसागर (रा. पिंपळे गुरव), बाबा शेख (रा. सांगवी), अनिल गायकवाड (रा. खडकी), स्वप्नील पालके (रा. औंध) यांच्याविरुद्ध आर्म अॅक्टखाली गुन्हा दाखल केला आहे.
पोलिसांनी सांगितले की,, सौरभ मुरकुटे यांचे औंध गावात अंडा विक्रीचे दुकान आहे. सोमवारी रात्री साडेनऊ वाजता ते दुकान बंद करुन जात असताना त्यांच्या ओळखीच्या आरोपींनी त्यांना गाठले. 10 हजार रुपये हप्ता देण्याच्या कारणावरुन फिर्यादी यांना लोखंडी कोयता, लोखंडी गज, दांडके यांचा धाक दाखवून मारहाण करुन त्यांच्या शर्टच्या खिशातील 2 हजार रुपये जबरदस्तीने काढून घेतले. त्यांच्या मदतीसाठी येणार्या लोकांना धमकावून परिसरात दहशत निर्माण केली आहे.
