अज्ञाताविरुद्ध गु्न्हा : मुंबई -पुणे महामार्गावरील सीएमई गेटसमोर घडली घटना
महाराष्ट्र ३६० न्यूज नेटवर्क
पुणे : मुंबई -पुणे महामार्गावरील दापोडी येथील सीएमई (CME) गेटसमोरुन मोटारसायकलस्वार जात असताना त्याच्या गळ्यात पतंगीचा मांजा अडकून जखमी झाल्याचा प्रकार समोर आला आहे. मांजामुळे गळा कापला जाऊन शहरात काही जणांचा मृत्यु झाला आहे.
त्यामुळे सर्वत्र चायनीज मांजावर बंदी घालण्यात आली आहे.
आशिष सुरेश पवार (वय ३२, रा. भाऊ पाटील चाळ, साळवेनगर, बोपोडी) असे जखमी झालेल्या मोटारसायकलस्वाराचे नाव आहे.
आशिष पवार सोमवारी सायंकाळी पावणेसहा वाजता मोटारसायकलवरुन मुंबई -पुणे महामार्गावरुन जात होते. सीएमई गेटसमोर ते आले असताना कोणाचा तरी पंतग उडविताना पंतग कट झाला व मांजा रस्त्यावर पडला. त्याचवेळी आशिष पवार तेथून जात असल्याचे तो मांजा त्यांच्या गळ्याला व बोटाला लागून ते जखमी झाले. भोसरी पोलिसांनी याप्रकरणी अज्ञाताविरुद्ध (गु. र. नं. ६५५/२१) गुन्हा दाखल केला आहे.
