रेखाचित्रकार चरवड आणि सायकलपट्टू प्रीती म्हस्केंसह आधुनिक नवदुर्गांचा गौरव
महाराष्ट्र ३६० न्यूज नेटवर्क
पुणे : गणेशोत्सव काळात ज्या मंडळांनी अतिशय चांगल्या पद्धतीने व नावीन्यपूर्ण पद्धतीने उत्सव साजरा केला अशा शिस्तबद्ध बारा गणेश मंडळांचा समर्थ पोलीस स्टेशनकडून सन्मानचिन्ह देऊन सत्कार करण्यात आला., तसेच रेखाचित्रकार प्रा. गिरीश चरवड आणि सायकलपट्टू प्रीती म्हस्के यांच्यासह आधुनिक नवदुर्गांचा गौरवही करण्यात आला.
मंगळवारी (५ ऑक्टोबर) सायंकाळी सहा वाजता आगामी नवरात्र उत्सव व मोहंमद पैगंबर जयंती या उत्सवाचे अनुषंगाने बैठक बोलाविण्यात आली होती. नेहमीच वेगवेगळा उपक्रम राबविणाऱ्या समर्थ पोलीस स्टेशनकडून बैठकीदरम्यान गणपती उत्सवाच्या काळात ज्या मंडळांनी अतिशय चांगल्या पद्धतीने व नावीन्यपूर्ण पद्धतीने उत्सव साजरा केला, अशा बारा गणेश मंडळांना सन्मानचिन्ह देऊन सत्कार करण्यात आला.
सदरवेळी प्रमुख पाहुणे म्हणून रेखचित्रकार प्रा. गिरीश चरवड, सायकलपट्टू प्रीती म्हस्के (सुवर्ण चतुष्कोन २४ दिवसात ६००० कि.मी इतके अंतर सायकलवर पार केलेल्या तसेच जम्मू-काश्मिर ते कन्याकुमारी हे अंतर १७ दिवसांत पार केलेल्या पहिल्या महिला), वरिष्ठ पोलीस निरीक्षक विष्णू ताम्हाणे, पोलीस निरीक्षक (गुन्हे) उल्हास कदम, समर्थ पोलीस स्टेशनकडील सर्व अधिकारी व अंमलदार, नवरात्र व गणेशोत्सव मंडळाचे अध्यक्ष व कार्यकर्ते असे एकूण ५० ते ६० जण उपस्थित होते.
समारंभाच्या दरम्यान रेखाचित्रकार प्रा. गिरीश चरवड यांनी त्यांनी काढलेल्या रेखाचित्रवरून पोलिसांना तपासामध्ये कशाप्रकारे मदत होत आहे आणि कशी मदत झाली, त्याचप्रमाणे रेखचित्र काढताना येणारे अडचणी कशा निर्माण होतात, याबाबत मार्गदर्शन केले.
तसेच खडक पोलीस स्टेशनकडील दाखल गुन्ह्यात बाललैंगिक अत्याचार गुन्ह्यातील अज्ञात आरोपीचे पीडित मुलीने केलेल्या वर्णनावरून रेखाचित्रकार प्रा. चरवड सर यांनी रेखाचित्र काढून त्याचा पोलीस उपनिरीक्षक कुटे यांनी तपासपथकाच्या मदतीने शोध घेऊन गुन्हेगारास अटक करून गुन्हा उघडकीस आणला, त्याबद्दल रेखचित्रकार यांचादेखील सन्मान करण्यात आला.
सायकलपट्टू प्रीती म्हस्के यांनी शरीर तंदुरुस्त व सदृढ राहण्याकरिता व कामाच्या ताणतणावातून वेळात वेळ काढून व्यायाम करणे किती फायद्याचे आहे आणि व्यायामामुळे आलेला थकवा कशाप्रकारे दूर होतो, याबाबत मार्गदर्शन केले. महिला पोलीस अधिकारी ज्योती कुटे व सायकलपट्टू प्रीती म्हस्के या आधुनिक नवदुर्गांचा त्यांच्या कामगिरीनिमित्त समर्थ पोलीस स्टेशनकडून सत्कार करण्यात आला.
त्याप्रमाणे आगामी नवरात्र उत्सवाचे अनुषंगाने नवरात्र उत्सव साजरे करणारे मंडळांना नवरात्र उत्सव साध्या पद्धतीने साजरा करण्याबाबत व महाराष्ट्र शासन परिपत्रक क्र आरएलबी-०९२१/प्र.क्र.२२१/विशा १ब दि ०४/१०/२०२१ प्रमाणे दिलेल्या सुचना वाचुन दाखविले व सूचनांचे तंतोतंत पालन करण्याबाबत सांगून मार्गदर्शन केले.
सन्मानित करण्यात आलेली गणेश मंडळे
१) हिंद माता तरुण मंडळ, २) शिवशक्ती तरुण मंडळ, ३) बनकर तालीम संघ, ४) गोसावीपुरा मित्र मंडळ, ५) अश्विनी मित्र मंडळ, ६) अपोलो तरुण मंडळ ७) गणेश तरुण मंडळ ८) साखळी पीर तालीम ९) खडीचे मैदन मित्र मंडळ १०) विक्रम मंडळ ११) जय बजरंग कबड्डी संघ १२) आझाद तरुण मंडळ
