अर्धा किलो गांजा जप्त : म्हातोबानगर वाकड येथे पोलिसांची कारवाई
महाराष्ट्र ३६० न्यूज नेटवर्क
पुणे : गांजा बाळगल्या प्रकरणी पिंपरी-चिंचवड गुन्हे शाखेच्या अंमली पदार्थ विरोधी पथकाने दोघांना अटक केली आहे. त्यांच्याकडून 527 ग्रॅम वजनाचा गांजा जप्त करण्यात आला आहे. ही कारवाई मंगळवारी (दि. 5) दुपारी सव्वाएक वाजताच्या सुमारास म्हातोबानगर वाकड येथे करण्यात आली.
पूनितकुमार विवेक शेट्टी (वय 28), अशोक मरिबा तुपेरे (वय 20, दोघे रा. म्हातोबानगर, वाकड) अशी अटक केलेल्या आरोपींची नावे आहेत. याप्रकरणी अंमली पदार्थ विरोधी पथकाचे पोलीस शिपाई प्रसाद जांगिलवाड यांनी वाकड पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे.
पोलिसांनी सांगितले की, म्हातोबानगर येथे दोघेजण संशयितपणे थांबले असून त्यांच्याकडे गांजा असल्याची माहिती पिंपरी-चिंचवड गुन्हे शाखेच्या अंमली पदार्थ विरोधी पथकाला मिळाली. त्यानुसार पोलिसांनी कारवाई करत पूनितकुमार आणि अशोक या दोघांना ताब्यात घेतले. त्यांच्याकडे चौकशी करत 13 हजार 715 रुपये किमतीचा 527 ग्रॅम वजनाचा गांजा पोलिसांनी जप्त केला. सहाय्यक पोलीस निरीक्षक महाले तपास करीत आहेत.

















