वानवडी पोलिसांची कारवाई : महंमदवाडी येथे घडली होती घटना
महाराष्ट्र ३६० न्यूज नेटवर्क
पुणे : पादचारी मुलीचा मोबाईल चोरून नेणाऱ्यास हडपसर पोलिसांनी अटक केली. ही घटना वाडकर मळा रोड, नवनाथ हॉटेल, महंमदवाडी येथे २४ ऑगस्ट २०२१ रोजी घडली होती.
रमेश नागेश माने (वय १९, रा. माळवाडी, हडपसर) असे अटक केलेल्याचे नाव आहे. याप्रकरणी १८ वर्षींय मुलीने हडपसर पोलीस स्टेशनमध्ये फिर्याद दिली असून, त्यानुसार गुन्हा दाखल केला आहे.
पोलिसांनी सांगितले की, फिर्यादी पायी जात असताना आरोपीने दुचाकीवरून जवळ जात हातातील अकरा हजार रुपये किमतीचा मोबाईल चोरून नेला. पुढील तपास हडपसर पोलीस स्टेशनचे सहायक पोलीस निरीक्षक दत्तप्रसाद शेंडगे करीत आहेत.















