सहकारनगर पोलिसांत गुन्हा : पुणे-सातारा रस्त्यावर अहिल्यादेवी चौकात घडली घटना
महाराष्ट्र ३६० न्यूज नेटवर्क
पुणे : तू आमच्या कारला कात्रज चौकात का दाबले असा जाब विचारीत कारमधील दोघांनी पीएमपी चालकाच्या डोक्यात कठीण वस्तूने मारून दमबाजी करीत निघून गेले. ही घटना पुणे-सातारा रस्त्यावर अहिल्यादेवी चौकात घडली.
याप्रकरणी सुधीर कागदे (वय ३८, रा. कात्रज गाव, पुणे) यांनी सहकारनगर पोलीस स्टेशनमध्ये फिर्याद दिली असून, त्यानुसार कारमधील दोन अज्ञाताविरुद्ध गुन्हा दाखल केला आहे.
पोलिसांनी सांगितले की, फिर्यादी पीएमपीचालक असून, ते पुणे-सातारा रस्त्यावर अहिल्यादेवी चोकामध्ये बीआरटी मार्गावर थांबले होते. त्यावेळी कारमधील दोन अज्ञातांनी बसजवळ येऊन तू आमच्या कारला कात्रज चौकात का दाबले असे विचारत दमबाजी करत डोक्यात कठीण वस्तूने मारून जखमी करून पसार झाले. सरकारी कामात अडथळा आणल्याप्रकरणी त्यांच्यार गुन्हा दाखल केला असून, पुढील तपास सहकारनगर पोलीस स्टेशनचे महिला सहायक पोलीस निरीक्षिका किरण मदने करीत आहेत.
