कोंढवा पोलिसांची कारवाई : बोपदेव घाटाकडे जाणाऱ्या रस्त्यावरील घटना
महाराष्ट्र ३६० न्यूज नेटवर्क
पुणे : रस्त्याच्या कडेला का थांबले असे विचारले म्हणून पोलीस अंमलदाराच्या अंगावर धावून जाऊन धक्काबुक्की करीत बघून घेण्याची धमकी देणाऱ्या दोघांना कोंढवा पोलिसांनी अटक केली. बोपदेव घाटाकडे जाणाऱ्या रस्त्यालगत ६ ऑक्टोबर रोजी दुपारी दीडच्या सुमारास एका हॉटेलजवळ ही घटना घडली.
गौरव निवृत्ती पवार (वय ३३, रा. पाटीलनगर, येवलेवाडी आणि २८ वर्षीय महिलेला अटक केली आहे. याप्रकरणी कोंढवा पोलीस स्टेशनचे पोलीस अंमलदार संदीप जाधव यांनी फिर्याद दिली असून, त्यानुसार गुन्हा दाखल केला आहे.
पोलिसांनी सांगितले की, फिर्यादी पीटर मोबाईलवर वायरलेस ऑपरेटर म्हणून बोपदेव घाटाकडे जाणाऱ्या रस्त्यावर पेट्रोलिंग करीत होते. यावेळी त्यांना एका हॉटेलजवळ एक पुरुष आणि महिला थांबलेली दिली. त्यामुळे त्यांनी येथे का थांबले असे विचारले. त्यावेळी फिर्यादीने अंगावर धावून जात धक्काबुक्की केली. तसेच बघून घेण्याची धमकी दिली.
सरकारी कामात अडथळा आणल्याप्रकरणी त्यांच्यावर गुन्हा दाखल केला असून, कोंढवा पोलीस स्टेशनचे सहायक पोलीस उपनिरीक्षक स्वराज्य पाटील पुढील तपास करीत आहेत.
