उत्तमनगर पोलिसांत गुन्हा : सायंकाळी ६ ते रात्री १०च्या दरम्यान घडली घटना
महाराष्ट्र ३६० न्यूज नेटवर्क
पुणे : शहरामधील गांधी फार्म हाऊस आणि बोके फार्म हाऊस, मांडवी खुर्द येथील सुमारे बारा हजार रुपये किंमतीची दोन चंदनाची झाडे कटरने कापून चोरट्यांनी चोरून नेली.
किसन शेंडे (वय ५५, रा. कर्वेनगर, पुणे) यांनी उत्तमनगर पोलीस स्टेशनमध्ये फिर्याद दिली असून, त्यानुसार गुन्हा दाखल केला आहे.
पोलिसांनी सांगितले की, फिर्यादी गांधी फार्म हाऊस आणि बोके फार्म हाऊसमधून चंदनाची झाडे अज्ञात चोरट्याने कटरने कापून चोरून नेली.
पुढील तपास उत्तमनगर पोलीस स्टेशनचे पोलीस उपनिरीक्षक गणेश माने करीत आहेत.
