समाजकंटकावर कारवाई करा : सोसायटीतील नागरिकांनी झाडे तोडणाराचे काढले फोटो
महाराष्ट्र ३६० न्यूज नेटवर्क
पुणे : महंमदवाडी येथील मिथुन सोसायटीच्या बाहेरील बाजूला सार्वजनिक भुखंडावर वृक्षारोपण करण्यात आले होते. वृक्षारोपण करण्यात आलेली ही झाडे भरदिवसा उखडून टाकण्याचा प्रकार समोर आला आहे.
हा प्रकार समजताच मिथुन सोसायटीतील रहिवासी शुक्रवारी सकाळी रस्त्यावर आले. त्यांनी ही झाडे तोडतांना नागरिकांनी फोटो काढले असून, झाडे तोडून टाकणार्या समाजकंटकांविरुद्ध गुन्हा दाखल करण्याची मागणी केली आहे.
पोलिसांनी सांगितले की, महमंदवाडीतील मिथुन सोसायटीच्या बाहेरील बाजूला मोकळी जागा आहे. तेथे अनेकदा गुन्हेगारी कारवायांसाठी टोळके जमतात. त्यांना रोखण्यासाठी रहिवाशांनी काही महिन्यांपूर्वी वृक्षारोपण केले होते. ही झाडे चांगली 7 फुटापर्यंत वाढली होती. एका टेम्पोतून चार ते पाच जण आले. त्यांनी मोकळ्या भूखंडावर वृक्षारोपण केलेली झाडे एका पाठोपाठ उपटून टाकली.
ही जागा बळकाविण्याचा काही समाजकंटकांचा प्रयत्न असावा. त्यातूनच जर ही झाडे मोठी वाढली तर जागा बळकाविण्यात अडचण येईल, यामुळे वृक्षारोपण केलेली ही झाडे तोडून टाकली असावी, असे येथील रहिवाशांना वाटत आहे. ज्या 4 ते 5 जणांनी ही झाडे तोडून टाकली, त्यांचे फोटो रहिवाशांनी काढले असून पोलिसांनी त्यांच्यावर कारवाई करावी, अशी रहिवाशांची मागणी आहे.
