अमली पदार्थ विरोधी पथक २ ची कामगिरी : आरोपी वारजे पोलीस ठाण्याच्या ताब्यात
महाराष्ट्र ३६० न्यूज नेटवर्क
पुणे : ‘मोक्का’तील वाँटेड आरोपीच्या, तो लपलेल्या ठिकाणी जाऊन मुसक्या आवळण्यात अमली पदार्थ विरोधी पथक २ ला यश मिळाले असून, पुढील कारवाईसाठी सदर आरोपीस वारजे पोलीस ठाण्याच्या ताब्यात देण्यात आले आहे.
अमली पदार्थ विरोधी पथक ०२, गुन्हे शाखा पुणे शहरकडील पोलीस अंमलदार योगेश मांढरे यांना बातमीदारामार्फत माहिती मिळाली की, वारजे माळवाडी पोलीस ठाणे पुणे शहर अंतर्गत मोक्का गुन्ह्यातील पाहिजे आरोपी आकाश ऊर्फ सोन्या विष्णु आखाडे (रा. सहयोगनगर, वारजे पुणे) हा सध्या मु. पो. सुकाळी जहागीर (ता. उमरखेड, जि. यवतमाळ) येथे वास्तव्य करीत आहे. सदर बातमीची पडताळणी करून वरिष्ठांच्या परवानगीने पोलीस उपनिरीक्षक दिगंबर चव्हाण, चेतन गायकवाड, युवराज कांबळ, पोलीस शिपाई मांढरे, असे नमुद गावी नमुद ठिकाणी जाऊन त्यांनी सदर आरोपीचा शोध घेऊन ताब्यात घेतले असता, त्याने सदर गुन्ह्याची कबुली दिल्याने त्यास पुढील कारवाईसाठी वारजे पोलीस ठाण्याच्या ताब्यात दिले आहे.
वरील नमुद कारवाई ही, पोलीस आयुक्त अमिताभ गुप्ता, पोलीस सहआयुक्त डॉ. रवींद्र शिसवे, अपर पोलीस आयुक्त रामनाथ पोकळे, पोलीस उपआयुक्त (गुन्हे) श्रीनिवास घाडगे, सहायक पोलीस आयुक्त (गुन्हे २) लक्ष्मण बोराटे यांच्या मार्गदर्शनाखाली अमली पदार्थ विरोधी पथक गुन्हे शाखा पुणे शहरकडील पोलीस निरीक्षक प्रकाश खांडेकर, पोलीस उपनिरीक्षक दिगंबर चव्हाण व चेतन गायकवाड, युवराज कांबळ, पोलीस शिपाई मांढरे यांनी केली आहे.
