वानवडी पोलिसांची कारवाई : २० हजारांचा मुद्देमाल जप्त
महाराष्ट्र न्यूज ३६० नेटवर्क
पुणे : गावठी कट्ट्यासह दोघांना जेरबंद करण्यात वानवडी पोलिसांना यश मिळाले असून, एकूण २० हजारांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे.
वानवडी पोलीस स्टेशन हद्दीत यंदा घटस्थापना काळात गुन्हे प्रतिबंधात्मक पेट्रोलिंग वाढविण्यात आली असून, वानवडी पोलीस स्टेशनकडील तपासपथकातील पोलीस अधिकारी व अंमलदार हे सतर्कतेने पेट्रोलिंग करीत असतात. दि. ०१ ऑक्टोबर रोजी पोलीस अंमलदार अमजद पठाण यांना त्यांच्या बातमीदाराकडून माहिती मिळाली की, पोलीस अभिलेखावरील आरोपी हे हडपसर इंडस्ट्रिअल एरिया हडपसर पुणे भागात आले असून, त्यांच्याकडे अग्निशस्त्र आहे.
सदर बातमीचा अनुषंगाने वरिष्ठ पोलीस निरीक्षक दीपक लगड यांच्या मार्गदर्शन व सूचनेनुसार त्यांना हडपसर इंडस्ट्रियल एरियाकडे जाणाऱ्या रोडवर, सेन्ट पेट्रिक ग्राऊंडशेजारी छापा कारवाई करून पकडले असता आरोपी सलमान कलीम खान (वय २८, रा. भारत नगर, द्वारका, नाशीक) आणि नदीम वहाब शेख (वय २२, रा. अजिंठा, ता. सिल्लोड, जि. औरंगाबाद) यांच्याकडे असलेल्या इको कारमधून एक २०,००० रुपये किमतीचा गावठी बनावटीचा लोखंडी कट्टा व दोन जिवंत काडतुसे जप्त करण्यात आली. याबाबत वानवडी पोलीस स्टेशनमध्ये गुन्हा नोंद करण्यात आलेला असून, दोन्ही आरोपींना अटक करण्यात आलेली आहे.
सदरची कामगीरी ही, पोलीस आयुक्त अमिताभ गुप्ता, पोलीस सहआयुक्त डॉ. रवींद्र शिसवे, अप्पर पोलीस आयुक्त नामदेव चव्हाण, पोलीस उपआयुक्त नम्रता पाटील, सहायक पोलीस आयुक्त राजेंद्र गलांडे यांच्या मार्गदर्शनाखाली वरिष्ठ पोलीस निरीक्षक दीपक लगड, पोलीस निरीक्षक (गुन्हे) सावळाराम साळगावकर, यांच्या सूचनांनुसार तपासपथकातील प्रभारी अधिकारी सहा पोलीस निरीक्षक जयवंत जाधव, पोलीस अंमलदार संतोष तानवडे, अमजद पठाण, राजू रासगे, संजय बागल, संतोष नाईक, विनोद भंडलकर, अतुल गायकवाड, सर्फराज देशमुख, सागर जगदाळे, शिरीष गोसावी, गणेश खरात, अमित चिव्हे, दीपक भोईर ,राणी खांदवे यांचे पथकाने केलेली आहे.















