पुण्यात प्रचंड खळबळ : जयपूरमध्ये लेफ्टनंट कर्नल पदावर होत्या नेमणुकीस
महाराष्ट्र ३६० न्यूज नेटवर्क
पुणे : जयपूर येथे नेमणुकीस असलेल्या लेफ्टनंट कर्नल रश्मी मिश्रा या सहा महिन्यांच्या ट्रेनिंगसाठी पुण्यात आल्या असताना गळफास घेऊन आत्महत्या केल्याची घटना समोर आली आहे. कौटुंबिक वादातून आत्महत्या केल्याचा अंदाज पोलिसांनी व्यक्त केला आहे. याप्रकरणी वानवडी पोलिसांनी गुन्हा दाखल केला आहे.
43 वर्षीय लेफ्टनंट कर्नल महिलेने कौटुंबिक कारणामुळे आत्महत्या केल्याचे पोलिसांकडून सांगण्यात येत आहे. पण याबाबत सखोल तपास केला जात आहे.
पुण्यातील मिलिटरी इंटेलिजन्स ट्रेनिंग स्कुल हे महाराष्ट्रातील एक अतिशय लोकप्रिय कॉलेज आहे. या संस्थेची स्थापना 1950 मध्ये करण्यात आली आहे. येथील संस्थेत 9 वेगवेगळे अभ्यासक्रम शिकवले जातात. तसेच वेगवेगळ्या प्रकारचे प्रशिक्षण दिले जाते. या प्रशिक्षणासाठी लेफ्टनंट कर्नल महिला आली होती. 43 वर्षाच्या या महिला लष्करी अधिकार्यांनी गळफास घेऊन आत्महत्या केल्याचे उघडकीस आले. त्यांनी आत्महत्या नेमक्या कोणत्या कारणामुळे केले हे अद्याप समोर आले नाही. त्या ठिकाणी लष्करचे वरिष्ठ अधिकारी तसेच वानवडी पोलिसांनी भेट दिली आहे. हा प्रकार लष्करातील अधिकार्यांसंबंधी असल्याने याबाबत अधिकृतपणे पोलिसांनी माहिती देण्यास नकार दिला आहे. मात्र, एका लेफ्टनंट कर्नल दर्जाच्या महिला अधिकार्यांनी आत्महत्या केल्याचे सांगितले आहे यामुळे लष्करमध्ये एकच खळबळ उडाली आहे.
दरम्यान, एका पोलीस अधिकाऱ्याने सांगितले की याप्रकरणी आत्महत्येस प्रवृत्त केल्याचा गुन्हा दाखल केला जात आहे.
मात्र, त्याची सविस्तर माहिती अद्याप उपलब्ध झालेली नाही.
या प्रकरणी लष्कराच्या अधिकाऱ्यांशी संपर्क साधला असता त्यांनी सांगितले की, महिला अधिकारी कोर्ससाठी आर्मी इंटेलिजन्स ट्रेनिंग स्कुलमध्ये आल्या होत्या. हे आत्महत्येचं प्रकरण असून स्थानिक पोलिस याचा तपास करीत आहेत. लष्कर त्यांना आवश्यक ती माहिती देत आहे.