आंबेगाव बुद्रुक येथील घटना : वीजबिल न भरल्याने केली होती कारवाई
महाराष्ट्र ३६० न्यूज नेटवर्क
पुणे : दुकानातील विजेचे बिल भरले नाही म्हणून शासकीय कर्मचाऱ्यांनी वीज मीटर काढून नेला. यावेळी दुकानदाराने कर्मचाऱ्यांना अपशब्द वापरून सरकारी कामात अडथळा आणल्याप्रकरणी गुन्हा दाखल केला आहे. ही घटना मंगळवारी (दि. १२ ऑक्टोबऱ) दुपारी साडेबाराच्या सुमारास आंबेगाव बुद्रुक येथे घडली.
संदीप पवार (रा. आंबेगाव बुद्रुक, पुणे) असे अटक केलेल्याचे नाव आहे. याप्रकरणी संतोष गावडे (वय ४१, रा. आंबेगाव खुर्द, गावठाण, पुणे) यांनी भारती विद्यापीठ पोलीस स्टेशनमध्ये फिर्याद दिली असून, त्यानुसार गुन्हा दाखल केला आहे.
पोलिसांनी सांगितले की, फिर्यादी व सहकारी शासकीय काम करीत होते. आरोपीने दुकानातील वीजेचे बिल मागिल सहा महिन्यापासून भरले नव्हते. त्यामुळे वरिष्ठांच्या आदेशावरून मीटर काढून नेत असताना आरोपीने मीटर काढल्याच्या रागातून अपशब्द वापरून सरकारी कामात अडथळा आणला.
पुढील तपास भारती विद्यापीठ पोलीस स्टेशनचे पोलीस उपनिरीक्षक कुतवळ करीत आहेत.