युनिट-४ची कारवाई : ५८ हजारांचा ऐवज जप्त, विधीसंघर्षित बालक खडकी पोलिसांच्या ताब्यात
महाराष्ट्र ३६० न्यूज नेटवर्क
पुणे : खडकीतील एम.जी. रोडवरील मोबाईल शॉपी फोडून ८६ हजार रुपयांचा ऐवज चोरून नेणाऱ्या गुन्हे शाखेच्या युनिट४ने जेरबंद केले. त्याच्याकडून चार मोबाईल हँडसेट ५८ हजार ९६० रुपयांचे मुद्देमाल जप्त केले असून, विधीसंघर्षित बालकास खडकी पोलीस स्टेशनच्या ताब्यात दिले आहे.
जावेद काळे असे अटक केलेल्या फरार आरोपीचे नाव आहे.
खडकी पोलीस स्टेशन हद्दीतील एम. जी. रोडवरील लक्ष्मी ट्रेडर्स इलेक्ट्रॉनिक शॉपच्या छताचा पत्रा उचकटून चोरट्यंनी ८६ हजार रुपये किमतीचे आठ मोबाईल चोरून नेले होते. या प्रकरणी खडकी पोलीस स्टेशनमध्ये गुन्हा दाखल केला होता. याचा समातंर तपास गुन्हे शाखेच्या युनिट-४कडून सुरू होता. दरम्यान अंमलदार प्रवीण भालचीम, राकेश खुणवे व अशोक शेलार यांनी सीसीटीव्ही फुटेज व तांत्रिक विश्लेषणाद्वारे आरोपीची माहिती काढली. आरोपी चोरी करून जातानाचे सीसीटीव्ही फुटेज मिळाली.
दरम्यान आरोपी खडकी रेल्वे स्टेशन परिसरात मोबाईल विकण्यासाठी येणार असल्याची माहिती सूत्रांकडून मिळाली. त्यानुसार सापळा रचून एकाला ताब्यात घेतल्यानंतर त्याने मित्र जावेद काळे याच्या मदतीने चोरी केल्याची कबुली दिली. त्याच्याकडे मोबाईल मिळून आले, तो विधिसंघर्षित बालक असल्याचे तपासात निष्पन्न झाले. त्यांच्याकडून ५८ हजार ९६० रुपयांचा मुद्देमाल त्यामध्ये ४ मोबाईल हँडसेट हस्तगत करण्यात आले. विधीसंघर्षित बालकास खडकी पोलीस स्टेशनच्या ताब्यात देण्यात आले. पुढील तपास पोलीस करीत आहेत.
पोलीस आयुक्त अमिताभ गुप्ता, पोलीस सहआयुक्त डॉ. रवींद्र शिसवे, अपर पोलीस आयुक्त रामनाथ पोकळे, पोलीस उपायुक्त श्रीनिवास घाडगे, सहायक पोलीस आयुक्त लक्ष्मण बोराटे यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस निरीक्षक जयंत राजूरकर यांच्या सूचनांप्रमाणे पोलीस उपनिरीक्षक जयदीप पाटील, पोलीस अंमलदार राजस शेख, प्रवीण बालचीम, राकेश खुणवे, दत्ता फुलसुंदर, विशाल शिर्के, अशोक शेलार, सागर वाघमरे यांच्या पथकाने ही कामगिरी केली.