कोंढवा पोलिसांनी एकाला केली अटक : पतीला जीवे मारण्याची दिली धमकी
महाराष्ट्र ३६० न्यूज नेटवर्क
पुणे : फिल्म इंडस्ट्रीजमध्ये शॉर्ट फिल्ममध्ये काम देतो, असे सांगून अनेक तरूणींची लैंगिक शिकार केल्याचे प्रकरण २ वर्षापूर्वी बॉलीवूडमध्ये चांगलेच गाजले होते. पुण्यात असा धक्कादायक प्रकार सुरु असल्याचे समोर आले आहे. शॉर्ट फिल्ममध्ये काम देण्याच्या आमिषाने नराधमाने 31 वर्षीय विवाहीतेवर वेळावेळी बलात्कार केल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे.
एका ३१ वर्षाच्या महिलेच्या फिर्यादीवरुन कोंढवा पोलिसांनी समीर बाळू निकम (वय ३२, रा. जिजाऊ बिल्डींग, नर्हेगाव) याला अटक केली आहे. हा प्रकार ऑक्टोबर २०१७ पासून १६ ऑक्टोबर २०२१ पर्यंत फिर्यादीच्या घरी आणि कोंढवा परिसरात सुरु होता.
याबाबत पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, समीर निकम हा यु ट्युबवर शॉर्ट फिल्म बनवितो. काही गाणीही त्याने बनविली आहेत.
या शॉर्ट फिल्ममध्ये काम देण्याच्या बहाण्याने त्याने फिर्यादी यांच्याशी ओळख वाढविली. त्यांच्या डोळ्यासमोर फिल्म इंडस्ट्रीचे स्वप्न उभे करुन त्यात काम मिळवून देण्याचा बहाणा करुन त्यांच्याशी शारीरीक जवळीक साधली. त्यानंतर फिर्यादी व त्यांच्या पतीला जीवे मारण्याची धमकी देऊन त्यांना मारहाण करुन वारंवार जबरदस्तीने बलात्कार केला. पोलीस उपनिरीक्षक सचिन खेतमाळस अधिक तपास करीत आहेत.
