सिंहगड रोड पोलिसांत सातजणांवर गुन्हा : घरगुती व हुंडा न दिल्याच्या रागातून झाला प्रकार
महाराष्ट्र ३६० न्यूज नेटवर्क
पुणे : घरगुती कारणावरुन तसेच हुंडा दिला नाही म्हणून वारंवार शिवीगाळ करुन मारहाण करताना पतीने इतके जोरात मारले की त्यात पत्नीच्या कानाचा पडदा फाटून गंभीर इजा झाली.
सिंहगड रोड पोलीस स्टेशनमध्ये एका २९ वर्षीय महिलेने फिर्याद (गु. र. नं. ४८६/२१) दिली आहे. जावेद मुल्ला (वय ३१, रा. रायकरनगर, धायरी) याच्यासह सात जणांविरुद्ध गुन्हा दाखल केला आहे.
पोलिसांनी सांगितले की, या विवाहितेचा २७ एप्रिल २०१८ पासून आतापर्यंत छळ केला जात होता. लग्नात हुंडा दिला नाही, तसेच घरगुती कारणावरुन तिला वारंवार शिवीगाळ करुन मारहाण केली जात होती. फिर्यादी यांचे स्त्री धनही स्वत:कडे ठेवून घेतले. जावेद मुल्ला याने मारहाण करताना फिर्यादी यांच्या कानावर इतका जोरात फटका मारला की त्यामुळे कानाचा पडदा फटून इजा झाली. त्यासाठी ते डॉक्टरांकडे गेले. तेव्हा पोलिसांत तक्रार केली तर बघुन घेईल, अशी धमकी दिली आहे. सहाय्यक पोलीस निरीक्षक तांदळे तपास करीत आहेत.
