बिबवेवाडी पोलीस स्टेशनमध्ये फिर्याद : बिबवेवाडीतील पोकळेवस्ती येथील घटना
महाराष्ट्र ३६० न्यूज नेटवर्क
पुणे : सासरच्या छळाला कंटाळून विवाहितेने आत्महत्या केली. तिला आत्महत्या करण्यास प्रवृत्त केल्याप्रकरणी विवाहितेचा पती व इतरांवर गुन्हा दाखल केला आहे. ही घटना मे २००० ते ३० ऑक्टोबर २०२१ दरम्यान देवळाली, ता. करमाळा, जि. सोलापूर व पोकळेवस्ती, बिबवेवाडी येथे घडली.
याप्रकरणी गोरख बालगुडे (वय ४२, रा. मिरगव्हाण करंजे, ता. करमाळा, जि. सोलापूर) यांनी बिबवेवाडी पोलीस स्टेशनमध्ये फिर्याद दिली असून, त्यानुसार गुन्हा दाखल केला आहे.
पोलिसांनी सांगितले की, फिर्यादी गोरख बालगुडे यांची मुलगी हिचे लग्न झाल्यानंतर ती पतीसमवेत नांदत असताना फ्लॅट घेण्यासाठी पैसे आणावेत यासाठी तिला मारहाण करून मानसिक, शारीरिक छळ केला जात होता. तिला गर्भधारणा होऊ नये म्हणून गोळ्या व पपई बळजबरीने खायला देऊन तिचा दोनवेळा गर्भस्राव घडवून आणला. या त्रासामुळे तिने आत्महत्या केली. बिबवेवाडी पोलीस स्टेशनचे पोलीस उपनिरीक्षक यश बोराटे पुढील तपास करीत आहेत.
