समर्थ पोलिस ठाण्यात गुन्हा : सोमवार पेठेतील प्रकार उघडकीस
महाराष्ट्र ३६० न्यूज नेटवर्क
पुणे : लॉजमध्ये काम करणाऱ्या एका 28 वर्षीय तरुणीला डांबून ठेवून लॉज मालकाने बलात्कार केल्याची घटना पुण्यात उघडकीस आली आहे. याप्रकरणी लॉज मालकावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. हा प्रकार सोमवार पेठेतील राजहंस लॉजमध्ये 2008 ते 2019 या कालावधीत घडला आहे.
मुकेश अगरवाल (वय-69 रा. भोसले नगर, गणेश खिंड रोड, पुणे) असे गुन्हा दाखल करण्यात आलेल्या आरोपीचे नाव आहे. याप्रकरणी 28 वर्षीय महिलेने समर्थ पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे.
पोलिसांनी सांगितले की, आरोपी हा राजहंस लॉजचा मालक असून, फिर्यादी या त्यांच्याकडे कामाला होत्या. 2008 मध्ये आरोपीने लॉजमधील एका रुममध्ये फिर्यादी यांना बंद करुन त्यांचा विनयभंग केला. तसेच आरोपीने जबरदस्तीने फिर्यादीसोबत शाररिक संबंध प्रस्थापीत केले. यानंतर आरोपीने 2019 पर्यंत वेळोवेळी फिर्यादी यांच्या गरीबीचा फायदा घेऊन जबरदस्तीने अत्याचार केल्याचे फिर्यादीत नमूद केले आहे. फिर्यादी यांनी दिलेल्या तक्रारीनुसार पोलिसांनी लॉज मालकाविरुद्ध 376 (2)(एन), 354,342, 417 अंतर्गत गुन्हा दाखल केला आहे. पुढील तपास समर्थ पोलीस करीत आहेत.
