गुन्हे शाखेच्या युनिट-२ची कारवाई : साथीदारांसह गुन्हा केल्याची दिली कबुली
महाराष्ट्र ३६० न्यूज नेटवर्क
पुणे : खंडणी उकळणाऱ्यास गुन्हे शाखा युनिट-२च्या पथकाने कोंढवा येथे सापळा रचून जेरबंद केले. साथीदारांसह गुन्हा केल्याची त्याने कबुली दिली. पुढील कारवाईसाठी कोंढवा पोलीस स्टेशनकडे वर्ग करण्यात आले.
करण केविन डिसोझ (वय २३, रा. अंबा वाटिका, अपोलो क्लीनिकजवळ, एन.आय.बी.एम. रोड, कोंढवा) असे अटक केलेल्या आरोपीचे नाव आहे.
पोलिसांनी सांगितले की, दिवाळी सणाच्या उत्सवात कोणताही अनुचित प्रकार घडू नये यासाठी गुन्हे शाखा युनिट-२चे पथक लष्कर पोलीस स्टेशन हद्दीत गस्त घालत होते. त्यावेळी कोंढवा पोलीस स्टेशनमध्ये दाखल गुन्ह्यातील आरोपी अन्नपूर्णा स्नॅक्स सेंटर येथे थांबल्याची माहिती सूत्रांकडून पोलिसांना मिळाली. त्यानुसार घटनास्थळी सापळा रचून त्याला ताब्यात घेऊन तपास केला असता त्याने गुन्ह्याची कबुली दिली. पुढील तपासासाठी कोंढवा पोलिसांकडे वर्ग करण्यात आले आहे.
पोलीस आयुक्त अमिताभ गुप्ता, पोलीस सहआयुक्त डॉ. रमेश शिसवे, पोलीस उपायुक्त भाग्यश्री नवटके, पोलीस उपायुक्त श्रीनिवास घाडगे, सहायक पोलीस आयुक्त लक्ष्मण बोराटे यांच्या मार्गदर्शनाखाली गुन्हे शाखेच्या युनिट-२चे वरिष्ठ पोलीस निरीक्षक क्रांतीकुमार पाटील, सहायक पोलीस निरीक्षक प्रकाश मोरे, सहायक पोलीस फौजदार यशवंत आंब्रे, सहायक पोलीस फौजदार अस्लमखान पठाण, पोलीस हवालदार मोहसीन शेख, पोलीस शिपाई समीर पटेल यांच्या पथकाने ही कारवाई केली.