बाप रे… काय चाललंय पुण्यात : पोलिसांनी अल्पवयीन मुलाला घेतले ताब्यात
महाराष्ट्र ३६० न्यूज नेवटर्क
पुणे : बापरे… पुण्यात नेमके चाललंय तरी काय असा प्रश्न समोर आला आहे. एका 10 वर्षाच्या अल्पवयीन मुलाला लघवी करण्याच्या बहाण्याने घेऊन जाऊन त्याच्यासोबत अनैसर्गिक कृत्य करण्याचा प्रयत्न केल्याची घटना पुण्यात घडली आहे. हा प्रकार शनिवारी (दि.6) सकाळी 10.15 वाजता वडगावशेरी येथील स्विमींग पुलाजवळील टॉयलेटमध्ये घडला. येरवडा पोलिसांनी एका अल्पवयीन मुलाला ताब्यात घेतले आहे.
याप्रकरणी पीडित मुलाच्या आईने (वय-39) येरवडा पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. पोलिसांनी अल्पवयीन मुलावर (वय-10) पॉक्सो क 4. 8 नुसार गुन्हा दाखल करुन त्याला ताब्यात घेतले आहे. या प्रकरणी अधिक माहिती अशी की, पीडित मुलगा आणि आरोपी हे दोघे एकाच वयाचे असून एकाच परिसरात राहतात. ते दोघे स्वीमींग पूलाजवळील टॉयलेटमध्ये लघवी करण्यासाठी गेले होते. त्यावेळी आरोपी अल्पवयीन मुलाने फिर्यादी यांच्या मुलासोबत अनैसर्गिक कृत्य करण्याचा प्रयत्न केला. महिलेने फिर्याद दिल्यानंतर येरवडा पोलिसांनी अल्पवयीन मुलाला ताब्यात घेतले आहे. पुढील तपास येरवडा पोलीस करीत आहेत.
