भारती विद्यापीठ पोलीस स्टेशनची कामगिरी :आंबेगाव बुद्रुक येथे घडली होती घटना
महाराष्ट्र ३६० न्यूज नेटवर्क
पुणे : हातउसने पैसे परत मागितल्याच्या कारणावरून जीवघेणा हल्ला करणाऱ्या दोघांना भारती विद्यापीठ पोलिसांनी अटक केली. ही घटना ६ नोव्हेंबर २०२१ रोजी आंबेगाव बुद्रुक येथील गायमुख चौकाजवळील ओढ्याजवळ घडली होती.
आकाश देविदास कोंढरे (वय २३, रा. आईसाहेब बिल्डिंग, भेंडी चौक, ग्रामपंचायतजवळ आंबेगाव, पुणे) यांनी भारती विद्यापीठ पोलीस स्टेशनमध्ये फिर्याद दिली होती. त्यानुसार गुन्हा दाखल केला होता.
लक्ष्मण वसंत कोंढरे (वय ४०, रा. आंबेगाव, पुणे), संजय ऊर्फ वाग्या भोसले (वय ४४, रा. भैरवनाथ मंदिराजवळ, आंबेगाव, पुणे) असे अटक केलेल्या दोघांची नावे आहेत.
पोलिसांनी सांगितले की, फिर्यादीचे वडिल देविदास बबन कोंढरे यांनी एक वर्षापूर्वी हातउसने २० हजार रुपये घेतले होते. ते परत मागितल्याच्या कारणावरून आरोपी लखन ऊर्फ लक्ष्मण वसंत कोंढे व त्याचा साथीदार संजय ऊर्फ वाग्या भोसले यांनी दमदाटी करून ढकलून देत लाकडी बांबू व लोखंडी धारदार हत्याराने डोक्यात जबर वार केला होता. हा प्रकार ६ नोव्हेंबर २०२१ रोजी घडला होता. या प्रकाराचा भारती विद्यापीठ पोलीस तपास करीत असताना तपास पथकाचे अधिकाऱ्यांना आरोपी आंबेगावमध्ये असल्याची माहिती सूत्रांकडून मिळाली. पोलिसांनी तातडीने आरोपींना ताब्यात घेऊन तपास केला असता, त्यांनी गुन्ह्याची कबुली दिली. आरोपींना न्यायालयात हजर केल्यानंतर पोलीस कोठडी सुनावण्यात आली. पुढील तपास पोलीस करीत आहेत.
पोलीस उपायुक्त सागर पाटील, सहायक पोलीस आयुक्त सुषमा चव्हाण, भारती विद्यापीठ पोलीस स्टेशनचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक जगन्नाथ कळसकर, पोलीस निरीक्षक संगीता यादव, विजय पुराणिक यांच्या मार्गदर्शनाखाली तपास पथकाचे पोलीस उपनिरीक्षक नितीन शिंदे, अंमलदार रवींद्र भोसले, रवींद्र चिप्पा, गणेश सुतार, सचिन पवार, निलेश खोमणे, योगेश सूळ, हर्षल शिंदे, अभिजित जाधव, गणेश शेंडे, राहुल तांबे, धनाजी धोत्रे, नवनाथ खताळ, सचिन गाडे, आशिष गायकवाड, विक्रम सावंत, जगदीश खेडकर, शिवदत्त गायकवाड, आकाश फासगे यांच्या पथकाने ही कामगिरी केली.