आरोपीला पोलिसांनी घेतले ताब्यात : वारजेतील न्यू अहिरे गावात घडली घटना
महाराष्ट्र ३६० न्यूज नेटवर्क
पुणे : एकाच रुममध्ये राहणार्या एकाने आपल्या दोन सहकार्यांवर कठीण वस्तूने डोक्यात वार केले. त्यात एकाचा मृत्यु झाला असून दुसरा गंभीर जखमी झाला आहे. ही घटना वारजे येथील न्यू अहिरे गावात बुधवारी पहाटे साडेचार वाजण्याच्या सुमारास घडली.
रामपूजन महेंद्र शर्मा (वय २२, रा. मुळगाव शंकरपूर, दरभंगा, बिहार) असे खून झालेल्या तरुणाचे नाव आहे. तर रामभरोस शर्मा (वय २१) हा जखमी झाला आहे.
पोलिसांनी सांगितले की, रामपूजन हा सुतारी काम करीत असत. हे तिघेही मुळचे बिहारचे राहणारे असून, गेल्या काही काळापासून गणपती माथा येथील रुममध्ये एकत्र राहत होते. त्यांच्यात काही कारणावरुन वाद झाला. त्यानंतर हरिकुमार शर्मा याने रामपूजन व रामभरोस यांच्या डोक्यात कठीण वस्तूने घाव घातले. त्यात रामपूजन याचा मृत्यु झाला. रामभरोस याला पोलिसांनी ससून रुग्णालयात दाखल केले आहे.
पोलिसांनी आरोपींला ताब्यात घेतले असून पोलीस निरीक्षक अमृत मराठे अधिक तपास करीत आहेत.
















