२६-११च्या हल्ल्यातील शहीद जवानांना श्रद्धांजली : पोलीस आयुक्तांसह अधिकाऱ्यांची उपस्थिती
महाराष्ट्र ३६० न्यूज नेटवर्क
पुणे : 26/11 च्या हल्ल्यातील शहिद जवानांच्या स्मृतिप्रित्यर्थ वानवडीतील पोलीस उपायुक्त कार्यालयामध्ये रक्तदान शिबिराचे आयोजन करण्यात आले होते. यावेळी १४९ अधिकारी-कर्मचाऱ्यांनी रक्तदान केले.
याप्रसंगी वानवडी, कोंढवा, बिबवेवाडी, मार्केटयार्ड पोलीस स्टेशनमधील अधिकारी आणि अंमलदार तसेच पोलीस मित्र परिवार यांनी रक्तदान शिबिरात सहभाग घेतला. याप्रसंगी पोलीस आयुक्त अमिताभ गुप्ता, पोलीस सहआयुक्त रवींद्र शिसवे, अप्पर पोलीस आयुक्त नामदेव चव्हाण, पोलीस उपायुक्त नम्रता पाटील मॅडम, सहाय्यक पोलीस आयुक्त राजेंद्र गलांडे, वानवडी, कोंढवा, मार्केट यार्ड, बिबेवाडी पोलीस स्टेशनचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक व पोलिस निरीक्षक गुन्हे, आमदार चेतन पाटील, वानवडी, कोंढवा, बिबवेवाडी, मार्केट यार्ड पोलीस स्टेशन हद्दीतील आजी माजी नगरसेवक, पोलीस मित्र, शांतता कमिटी सदस्य, महिला दक्षता समिती यांनी रक्तदान शिबिरात सहभाग घेतला.
