वारजे माळवाडी पोलिसांची कामगिरी : गोकुळनगर पठार देवगिरीगणेश मंदिराजवळ केली कारवाई
महाराष्ट्र ३६० न्यूज नेटवर्क
पुणे : खुनाचा प्रयत्न करून फरार झालेल्या आरोपींना वारजे-माळवाडी पोलिसांनी बेड्या ठोकल्या. गोकुळनगर पठार देवगिरीगणेश मंदिराजवळ सापळा रचून पोलिसांनी कारवाई करीत आरोपीला अटक केली.
विक्की ऊर्फ व्यंकटेश शिवशंकर अनपूर असे अटक केलेल्या आरोपीचे नाव आहे.
पोलिसांनी सांगितले की, वारजे-माळवाडी पोलीस स्टेशनमध्ये दाखल गुन्ह्यातील आरोपी गोकुळनगर पठार, देवगिरी गणेश मंदिराजवळ आल्याची माहिती सूत्रांकडून मिळाली. त्यानुसार पोलिसांनी घटनास्थळी धाव घेत सापळा लावून ताब्यात घेतले. गुन्ह्याच्या अनुषंगाने तपास केला असता, त्याने गुन्ह्याची कबुली दिली. पुढील तपास पोलीस उपनिरीक्षक बागल करीत आहेत.
अप्पर पोलीस आयुक्त राजेंद्र डहाळे, पोलीस उपायुक्त पौर्णिमा गायकवाड, सहाय्यक पोलीस आयुक्त गजानन टोम्पे, वारजे माळवाडी पोलीस स्टेशनचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक शंकर खटके, पोलीस निरीक्षक (गुन्हे) अमृत मराठे यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस उपनिरीक्षक नरेंद्र मुंढे, मनोज बागल, पोलीस अंमलदार गोविंद फड, अमोल राऊत, अण्णा काटकर, रमेश चव्हाण, बाळासाहेब शिरसाट, अजय कामठे, नितीन कातुर्डे, विजय भुरूक यांच्या पथकाने ही कामगिरी केली.
