भारती विद्यापीठ पोलिस स्टेशन, भारती विद्यापीठ परिवार, दक्षिण पुणे पत्रकार संघाचे आयोजन
महाराष्ट्र ३६० न्यूज नेटवर्क
कात्रज : महामारीनंतर माणसाला एकमेकांच्या आधाराची जाणिव झाली आहे, तो सामाजिक आधार या समन्वय संकल्पातूच मजबूत होईल अशी अपेक्षा अपर पोलिस आयुक्त राजेंद्र डहाळे यांनी व्यक्त केली.
भारती विद्यापीठाच्या मैदानावर गेली दोन दिवस सुरु असलेल्या समन्वय चषक क्रिकेट स्पर्धेचा आनंद क्रिकेट प्रेमींनी मनमुराद लुटताना सामाजिक समन्वयाचा विचार बळकट केला. लक्षवेधी ठरलेल्या समन्वय चषक क्रिकेट स्पर्धेत भारती विद्यापीठ पोलिस स्टेशनच्या कार्यक्षेत्रातील डॉक्टर, वकिल, पोलिस, पत्रकार, शिक्षक, सामाजिक कार्यकर्ते , लोकप्रतिनिधी अशा अठरा संघांना मागे टाकून महापालिका कर्मचारी संघाने समन्वय चषक पटकावला.
पहिल्या दिवशी विजयी झालेल्या नऊ संघात दुसऱ्या दिवशीची दुसरी फेरी अत्यंत अतीतटीची ठरली. या सर्वच रोमहर्षक सामन्यात डॉक्टर संघाने शांतता कमिटीचा पराभव केला मात्र वाहतूक पोलिसांनी डॉक्टर संघाचा पराभव केला. भारती विद्यापीठ कर्मचारी संघाने नागरी संघाचा पराभव केला.
भारती विद्यापीठ पोलीसांनी आर्यन एलेव्हनसह आजी माजी नगरसेवक संघाचा पराभव केला. महापालिका कर्मचारी संघ आणि भारती विद्यापीठ कर्मचारी संघ यांच्यातील अत्यंत रोमहर्षक लढतीत अखेर महापालिका कर्मचारी संघाने बाजी मारली आणि समन्वय चषक २०२१ वर विजयी मोहोर उमटवली.
भारती विद्यापीठ पोलिस स्टेशन, भारती विद्यापीठ परिवार, दक्षिण पुणे पत्रकार संघातर्फे आयोजित दोन दिवशीय समन्वय चषक स्पर्धेचा समारोप आणि पारितोषिक वितरण अपर पोलिस आयुक्त राजेंद्र डहाळे व उपायुक्त सागर पाटील यांच्या हस्ते पार पडला. संयोजक वरिष्ठ पोलीस निरीक्षक जगन्नाथ कळसकर, बाबामामा शिंदे आणि पत्रकार सचिन कोळी यांचा समन्वयाचा संकल्प भारती विद्यापीठ परिवार, सरहद, चिंतामणी ज्ञानपीठ, अभिनव एज्युकेशन सोसायटी आणि चाटे शिक्षण समुह, जानुबाई दहिहंडी उत्सव समिती, अक्षदा विवाह संस्था,
अप्पा परांडे, गणेश वनशीव व शुभम मांगडे मित्र परिवारासह सिध्दिविनायक ग्रुप, जनहित फाउंडेशन व राष्ट्रीय मानवाधिकार सुरक्षा संघाने
तडीस नेला.
