हडपसर पोलिसांत फिर्याद : कोरोनाबरोबर भुरट्याच्या चोरांनीही काढले डोके वर
महाराष्ट्र ३६० न्यूज नेटवर्क
पुणे : पादचारी महिलेच्या गळ्यातील एक लाख चाळीस हजार रुपयांची सोन्याची साखळी दुचाकीवरील चोरट्यांनी चोरून नेली. हडपसर-माळवाडीमधील साधना विद्यालयाजवळील मेडिकलशेजारी ३० डिसेंबर २०२१ रोजी सायंकाळी सात वाजता ही घटना घडली. कोरोनाबरोबर भुरट्या चोरट्यांचा धुमाकूळ वाढल्याने सामान्यांची डोकेदुखी वाढली आहे.
याप्रकरणी हडपसर-माळवाडीमधील ६१ वर्षीय महिलेने हडपसर पोलीस स्टेशनमध्ये फिर्याद दिली असून, त्यानुसार अज्ञात चोरट्याविरुद्ध गुन्हा दाखल केला आहे.
कोरोनाच्या भीतीने नागरिक अद्याप सावरले नाहीत. त्यातच सोनसाखळी चोरट्यांनी पुन्हा डोके वर काढले असल्याने सामान्यांनी घराबाहेर पडावे की नाही, अशी अवस्था निर्माण झाली आहे. भुरट्या चोरट्यांचा पोलिसांनी तात्काळ बंदोबस्त करावा, अशी मागणी जनमानसांतून केली जात आहे.
पोलिसांनी सांगितले की, हडपसर-माळवाडीमध्ये साधना विद्यालयाजवळ पादचाचारी महिलेच्या गळ्यातील एक लाख ४० हजार रुपयांची सोन्याची साखळी दुचाकीवरून आलेल्या चोरट्यांनी चोरून नेली. हडपसर पोलीस स्टेशनचे सहायक पोलीस निरीक्षक हनुमंत गायकवाड करीत आहेत.
