ज्येष्ठ नगरसेविका रंजना टिळेकर यांच्या हस्ते बस सेवेचे उदघाटन
महाराष्ट्र ३६० न्यूज नेटवर्क
पुणे: अप्पर इंदिरा,सुखसागर नगर मधील नागरिकांना कात्रजमध्ये येण्यासाठी सरळ मार्गे बस उपलब्ध नसल्याने स्थानिक नागरिकांची अडचण होत होती. माजी आमदार योगेश टिळेकर यांनी पीएमपीएमएलच्या अधिकाऱ्यांशी चर्चा करून कोरोना काळात बंद झालेली “अटल बस” पुन्हा सुरू करवून घेतली आहे.
आता या बस सेवेला प्रारंभ झाला असून ज्येष्ठ नगरसेविका रंजना टिळेकर यांनी या बस सेवेचे उदघाटन केले. या प्रसंगी नगरसेविका मनीषा राजाभाऊ कदम, वृषाली कामठे, विरेसन जगताप, कल्पना शेलार, डॉक्टर प्रकाश सासवडे व स्थानिक नागरिक उपस्थित होते.
अपर डेपो, आंबामाता मंदीर, सुखसागर नगर, खंडोबा मंदिर, गोकुळ नगर, कात्रज असा या बसचा मार्ग आहे. सामान्य नागरिकांना स्वस्तात बसचा प्रवास करता यावा म्हणून ५ रुपयात कोठेही प्रवास करता येईल असे या बसचे वैशिष्ट्य आहे.
