कोंढवा पोलिसांची दमदार कामगिरी : गुन्हा करून आरोपी झाले होते पसार
महाराष्ट्र ३६० न्यूज नेटवर्क
पुणे : खूनाचा प्रयत्न करून पळून गेलेल्या दोन आरोपींच्या कोंढवा पोलिसांनी मुसक्या आवळल्या. कोंढवा पोलीस स्टेशनमध्ये दाखल गुन्ह्यातील आरोपींना गुरमीटकल (जि. यादगिर, कर्नाटक) येथून ताब्यात घेऊन जेरबंद केले.
किरण नवनाथ रणदिवे आणि सूरज पांडुरंग खंडागळे असे अटक केलेल्या दोघांची नावे आहेत.
पोलिसांनी सांगितले की, कोंढवा पोलीस स्टेशनमधील दाखल गुन्ह्यातील आरोपींचा शोध कोंढवा पोलीस स्टेशनचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक सरदार पाटील, पोलीस निरीक्षक (गुन्हे) गोकुळ राऊत यांच्या सूचनेप्रमाणे तपास पथकातील अधिकारी सहायक पोलीस निरीक्षक अनिल सुरवसे व पोलीस अंमलदार योगेश कुंभार, गणेश चिंचकर, दीपक जडे, अमोल हिरवे, अभिजीत रत्नपारखी यांनी केला.
यावेळी आरोपी गुरमीटकल (जि. यादगिर, कर्नाटक) येथे पळून गेल्याची माहिती सूत्रांकडून मिळाली. त्यानुसार पोलिसांनी गुरमिटकल (जि. यादगिर, कर्नाटक) येथून आरोपींना अटक केली. पोलीस उपायुक्त व सहायक पोलीस आयुक्त यांच्या मार्गदर्शनाखाली पुढील तपास कोंढवा पोलीस करीत आहेत.















