हडपसर पोलिसांत फिर्याद : सोलापूर रस्त्यावर शेवाळेवाडी येथे झाला अपघात
महाराष्ट्र ३६० न्यूज नेटवर्क
पुणे : अज्ञात वाहनाच्या धडकेत तरुणाचा गंभीर जखमी होऊन मृत्यू झाला. पुणे-सोलापूर महामार्गावर शेवाळेवाडी येथील भारत पेट्रोलपंपासमोर २० जानेवारी २०२२ रोजी दुपारी सव्वाबारा ते पावणेएकच्या दरम्यान हा अपघात झाला. अपघातानंतर वाहनचालक पळून गेला.
नीरज पंकज धाराशिवकर (वय २१, रा. सातव प्लॉट, आशा निवास, आकाशवाणी, हडपसर, पुणे) असे अपघातात मृत्यू झालेल्याचे नाव आहे. याप्रकरणी अमोल उदावंत (वय ३६, रा. हडपसर, पुणे) यांनी हडपसर पोलीस स्टेशनमध्ये फिर्याद दिली असून, त्यानुसार अज्ञात वाहनचालकावर गुन्हा दाखल केला आहे.
पोलिसांनी सांगितले की, फिर्यादीचा चुलत भाऊ, मुलगी, चुलत बहीण, मुलगा नीरज भाजीपाला खरेदीसाठी शेवाळेवाडी येथे जात होते. त्यावेळी अज्ञात वाहनाची जोरदार धडक बसून अपघात झाला. या अपघातात नीरज धाराशिवकर गंभीर जखमी झाल्याने त्याचा मृत्यू झाला. अपघातानंतर अज्ञात वाहनचालक न थांबता पळून गेला. हडपसर पोलीस स्टेशनचे सहायक पोलीस निरीक्षक विजयकुमार शिंदे पुढील तपास करीत आहेत.
