समर्थ पोलिसांची कामगिरी : बारणे रस्त्यावर मंगळवार पेठेत केली कारवाई
महाराष्ट्र ३६० न्यूज नेटवर्क
पुणे : सराईत गुन्हेगाराला अटक करून तीन दुचाक्या जप्त केल्या. समर्थ पोलीस स्टेशनच्या पोलीस अधिकारी-कर्मचाऱ्यांनी ही दमदार कामगिरी केली.
विष्णू भाऊराव कुंडगीर (वय २२, रा. हडपसर स्टेशन, पुणे. मूळ- मु.पो. खेडा खु., ता. उदगीर, जि. लातूर) असे अटक केलेल्याचे नाव आहे.
पोलिसांनी सांगितले की, बारणे रोड, मंगळवार पेठ येथे दुचाकी घेऊन उभ्या असलेल्याकडे कागदपत्राची विचारणा केली असता, त्याने असमाधानकारक उत्तरे दिली. त्याला पोलीस स्टेशनला आणून सदरची दुचाकी शिवप्रताप चौक येथून चोरून नेल्याची कबुली दिली. तसेच दोन दिवसांपूर्वी नाना पेठ, पिंपरी चौक, पुणे येथून एमएच-१२-एव्ही-५७०० दुचाकी चोरली, तर गणेश पेठ येथून अॅक्टिव्हा अशा तीन चोरल्याची कबुली दिली.
अप्पर पोलीस आयुक्त राजेंद्र डहाळे, पोलीस उपायुक्त प्रियंका नारनवरे, सहायक पोलीस आयुक्त सतीश गोवेकर, फरासखाना पोलीस स्टेशनचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक विष्णू ताम्हाणे, समर्थ पोलीस स्टेशनचे पोलीस निरीक्षक उल्हास कदम यांच्या मार्गदर्शनाखाली सहायक पोलीस निरीक्षक संदीप जोरे, पोलीस अंमलदार संतोष काळे, सुशील लोणकर, सुभाष पिंगळे, हेमंत पेरणे, निलेश साबळे, विठ्ठल चोरमले, महेश जाधव, शुभम देसाई, सुभाष मोरे, श्याम सूर्यवंशी यांच्या पथकाने ही कामगिरी केली.

















