चतुश्रुंगी पोलिसांत फिर्याद : पाषाण परिसरात न्यूड फोटो व्हायरल करुन बदनामी
महाराष्ट्र ३६० न्यूज नेटवर्क
पुणे : पत्नीबरोबर घटस्फोट झाला असून, ती पैशासाठी माझ्याबरोबर राहत असल्याचे सांगून तरुणीला लग्नाचे आमिष दाखविले. तिच्याशी शारीरीक संबंध ठेवत पत्नीच्या मदतीने न्यूड फोटो काढून व्हॉटसअॅपवर व्हायरल करण्याची धमकी देत असल्याचा प्रकार उघडकीस आला आहे.
ही घटना २०१८ पासून २ फेब्रुवारी दरम्यान टर्फ क्लब हाऊस, कॅम्प व पाषाण येथील फिर्यादीच्या घरी घडला.
याप्रकरणी पाषाण येथील एका २७ वर्षाच्या तरुणीने चतु:श्रृंगी पोलिसांकडे फिर्याद दिली आहे. त्यावरुन पोलिसांनी विशाल गायकवाड (वय ४७, रा. पॅराडाईज व्हिला, एन आय बी एम रोड, कोंढवा) व त्याच्या पत्नीवर गुन्हा दाखल केला आहे.
पोलिसांनी सांगितले की, आरोपीने फिर्यादीचे व्यवसायामध्ये गुंतवणुक करायची आहे, असे म्हणून त्यांच्याशी जवळीक साधली. त्याने त्यांची पत्नी हिचेबरोबर पटत नसून आमचा घटस्फोट झाला आहे. ती फक्त माझ्यासोबत पैशांसाठी राहते असे खोटे सांगितले. फिर्यादीस लग्नाचे आमिष दाखवून फसवणूक करुन वेळोवेळी तिच्या संमतीशिवाय तिच्याबरोबर जबरदस्तीने शारीरीक संबंध ठेवले. माझ्यासोबत राहिली नाहीस तर मी तुला मारुन टाकीन अशी धमकी दिली.
फिर्यादी यांच्या लाँड्रीच्या दुकानात येऊन तेथील कामगारांना बाहेर काढून येथे कोणी काम करायचे नाही, अशी धमकी दिली. फिर्यादीचे लग्नानंतर तिच्या पतीला आरोपी व त्याच्या पत्नीने फिर्यादी व आरोपी विशाल गायकवाड यांचे न्युड फोटो तसेच फिर्यादीस मारहाण करातानाचे फोटो व्हॉटसअॅप करुन फिर्यादीची बदनामी केली. फिर्यादीने तक्रार दिली तर जीवंत ठेवणार नाही, अशी धमकी देऊन हाताने तसेच कमरेच्या पट्ट्याने मारहाण केली म्हणून गुन्हा दाखल करण्यात आला आहे. सहायक पोलीस निरीक्षक कोळी तपास करीत आहेत. 

 
			

















