कोथरूड पोलिसांत फिर्याद : जे.एस.सी. ओव्हरसीज कन्सलटंटच्या संचालकावर गुन्हा दाखल
महाराष्ट्र ३६० न्यूज नेटवर्क
पुणे : ऑस्ट्रेलियात नोकरीच्या आमिषाने बनावट व्हिसा देऊन तिघांना सहा लाख रुपयांना फसविले. याप्रकरणी कोथरुड पोलिसांनी जे. एस. सी. ओव्हरसीज कन्स्लटंटच्या संचालकांवर गुन्हा दाखल केला आहे.
वरुण जोगळेकर व एक महिला या दोघांवर गुन्हा दाखल केला आहे. याप्रकरणी खडकवासला येथील एका ३६ वर्षाच्या तरुणाने कोथरुड पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे.
जोगळेकर यांचे जे. एस. सी. ओव्हरसीज कन्सलटंटचे कोथरुडमध्ये कार्यालय आहे. जोगळेकर यांनी फिर्यादीस ऑस्ट्रेलियामध्ये नोकरी लावतो, असे आमिष दाखविले. फिर्यादी व इतर लोकांचा विश्वास संपादन करुन त्यांना ऑस्ट्रेलियन मॅरीटाईम क्रू हा खोटा व्हिसा दिला. त्यांच्याकडून वेळोवेळी ६ लाख रुपये घेतले नोकरी लावली नाही. फिर्यादी हे नोकरी न लावल्याने पैसे मागण्याकरीता गेले असताना त्यांना उडवाउडवीची उत्तरे दिली. खोटे गुन्हे दाखल करु, अशी धमकी दिली. फिर्यादी यांच्याबरोबर त्यांचा भाऊ व एक मित्र अशा तिघांसह इतरांची फसवणूक केली असल्याने गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पोलीस उपनिरीक्षक राठोड अधिक तपास करीत आहे.
