वारजेमाळवाडी पोलिसांत फिर्याद : टेम्पोचालकाला पोलिसांनी केली अटक
महाराष्ट्र ३६० न्यूज नेटवर्क
पुणे : भरधाव टेम्पोच्या धडकेत दुचाकीस्वाराचा मृत्यू झाला. टेम्पोचालकाला पोलिसांनी अटक केली आहे. शिवणे येथील एनडीए ग्राउंडसमोर २९ मार्च २०२२ रोजी सकाळी आठच्या सुमारास हा अपघात झाला.
वारजे माळवाडी पोलिसांनी पांडुरंग लक्ष्मण दाभाडे (वय ३३, रा. चाळ नं.१०,११, कोथरूड, पुणे) याला अटक केली आहे.
साहिल रेवननाथ वाळुंज (वय २०, रा. देशमुखवाडी, शिवणे, पुणे) असे अपघातात मृत्यू झालेल्या तरुणाचे नाव आहे. याप्रकरणी पोलीस अंमलदार सागर जगताप यांनी वारजे-माळवाडी पोलीस स्टेशनमध्ये फिर्याद दिली असून, त्यानुसार गुन्हा दाखल केला आहे.
पोलिसांनी सांगितले की, शिवणे येथील एनडीए ग्राऊंडसमोर साहिल देशमुख मोटारसायकलवरून जात होते. त्यावेळी भरधाव टेम्पोची दुचाकीला जोरदार धडक बसून अपघात झाला. या अपघातात दुचाकीस्वार गंभीर जखमी झाल्याने त्याचा मृत्यू झाला. वारजे माळवाडी पोलीस स्टेशनचे पोलीस उपनिरीक्षक आर. ए. पारवे पुढील तपास करीत आहेत.
