भारती विद्यापीठ पोलिसांत फिर्याद : आंबेगाव खुर्द येथील देवराई-३मध्ये झाली चोरी
महाराष्ट्र ३६० न्यूज नेटवर्क
पुणे : कुलूपबंद सदनिका फोडून दोन लाख ४० हजार ४०० रुपयांचा ऐवज चोरून नेणाऱ्या चोरट्यावर वारजे पोलिसांत गुन्हा दाखल केला आहे. ही घटना आंबेगाव खुर्द येथील देवराई-३मध्ये २८ मार्च २०२२ रोजी सकाळी ८ ते सायंकाळी सातच्या दरम्यान घडली.
जितेंद्र काटकर (वय ३३, रा. आंबेगाव खुर्द, पुणे) यांनी भारती विद्यापीठ पोलिसांत फिर्याद दिली असून, त्यानुसार गुन्हा दाखल केला आहे.
पोलिसांनी सांगितले की, फिर्यादीचा राहता फ्लॅट कुलूप लावून बंद होता. अज्ञात चोरट्याने दरवाजाचे कुलूप उचकटून सोन्या-चांदीचे दागिने, एक लॅपटॉप, एक्सटर्नल हार्डडिस्क असा एकूण दोन लाख ४० हजार ४०० रुपयांचा मुद्देमाल चोरून नेला. भारती विद्यापीठ पोलीस स्टेशनचे सहायक पोलीस निरीक्षक ए. आर. कवठेकर पुढील तपास करीत आहेत.
