भारती विद्यापीठ पोलिसांत फिर्याद : मांगडेवाडीतील केदारेश्वर कॉम्प्लेक्समध्ये झाली चोरी
महाराष्ट्र ३६० न्यूज नेटवर्क
पुणे : बंद फ्लॅटचे कुलूप उचकटून रोख दोन लाख आणि सोन्या-चांदीचे दागिने असा एकूण दोन लाख ६० हजार रुपयांच्या ऐवजावर चोरट्यांनी डल्ला मारला. मांगडेवाडी येथील केदारेश्वर कॉम्प्लेक्समध्ये २८ मार्च २०२२ रोजी रात्री ९ ते ३० मार्च २०२२ रोजी सकाळी १० च्या दरम्यान ही चोरीची घटना घडली.
मारुती गोरे (वय ३२, रा. मांगेडवाडी, पुणे) यांनी भारती विद्यापीठ पोलीस स्टेशनमध्ये फिर्याद दिली असून, त्यानुसार अज्ञात चोरट्याविरुद्ध गुन्हा दाखल केला आहे.
पोलिसांनी सांगितले की, फिर्यादीचा मांगडेवाडी येथील केदारेश्वरमधील राहता फ्लॅट कुलूप लावून बंद होता. चोरट्याने कुलूप उचकटून दोन लाख रुपये रोख आणि सोन्या-चांदीचे दागिने असा एकूण दोन लाख ६० हजार रुपयांचा ऐवज घरफोडी करून चोरून नेला. भारती विद्यापीठ पोलीस स्टेशनचे पोलीस उपनिरीक्षक अविनाश ढमे पुढील तपास करीत आहेत.
















