शिवाजीनगर पोलिसांत फिर्याद : पुणे-मुंबई येथील पाच जणांविरूध्द गुन्हा
महाराष्ट्र ३६० न्यूज नेटवर्क
पुणे : दीड बिटकॉईनसाठी बँक खात्यात पैसे भरायला सांगून पैसे भरल्यानंतरही बिटकॉईन न देता १९ लाख ७० हजार ८८६ रुपयांची एका तरुणाची फसवणूक करणाऱ्या पाचजणांवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
याप्रकरणी कुलदीप नारायण कदम (वय ३६, रा. शनिवार पेठ) यांनी फिर्याद दिली आहे. त्यावरुन शिवाजीनगर पोलिसांनी रंजित जनैलसिंह (वय ३७, रा. मिरा भाईदर, ठाणे), शब्बीर शेख (वय ४१, रा. मिरा रोड, ईस्ट), सुजॉय पॉल (रा. हांडेवाडी), मंगेश कदम (रा. गोखलेनगर), मुकुल (रा. मुंबई) यांच्याविरुद्ध गुन्हा दाखल केला आहे.
पोलिसांनी सांगितले की, आरोपींनी फिर्यादी यांचा विश्वास संपादन करुन त्यांना बिटकॉईन घेऊन देतो, असे सांगितले. १९ नोव्हेंबर २०२० रोजी बिटकॉईनचा दर साधारण साडेदहा लाख रुपये होता. दीड बिटकॉईनसाठी फिर्यादी यांनी रंजित जनैलसिंह याच्या बँक खात्यावर १९ लाख ७० हजार ८८६ रुपये पाठविले. त्यानंतर त्यांनी ठरल्याप्रमाणे बिटकॉईन दिले नाहीत. फिर्यादी यांनी मागणी केल्यावर त्यांना जीवे मारण्याची धमकी देऊन फिर्यादी यांची फसवणूक केली. सहायक पोलीस निरीक्षक नाईक तपास करीत आहेत.
