महाराष्ट्र न्यूज नेटवर्क
पुणे : सामाजिक बांधिलकी जपत गरजू रुग्णांना मदत करण्याच्या उद्देशाने भाजप व्यापारी आघाडीच्या पदाधिकाऱ्यांनी पालकमंत्री चंद्रकांत पाटील यांच्याकडे मदतीचा धनादेश सुपूर्द केला आहे.
चंद्रकांत पाटील याबाबत नागरिकांना आवाहन केले होते. या आवाहनाला प्रतिसाद देत या उपक्रमात खारीचा वाटा भाजप व्यापारी आघाडीने उचलला आहे. यावेळी भाजप व्यापारी आघाडीचे अध्यक्ष महेंद्र व्यास, वरिष्ठ उपाध्यक्ष पुणे शहर संतोष जैन, उमेश चौधरी यांच्या हस्ते चंद्रकांत पाटील यांनी धनादेश स्वरूपात निधी स्वीकारला.
















