महाराष्ट्र न्युज नेटवर्क
पुणे : वृत्तमाध्यमांमध्ये काम कऱणाऱ्या व्यक्तीवर पिस्तुलातून गोळी झाडून जीवे मारण्याचा प्रयत्न करणाऱ्या दोन गुन्हेगारांना स्वारगेट पोलिसांनी जेरबंद केले आहे. दिनांक ११ जून रोजी रात्री ९ वाजता फिर्यादीच्या राहत्या घराजवळ मोपेडवरून आलेल्या 5 आरोपींनी पाठलाग करत जवळच्या पिस्तुलातून गोळी झाडली. फिर्यादी गाडीवरून पडल्याने ते बचावले. त्यानंतर पोलिसांकडे तक्रार दाखल केली होती. या गुन्ह्यातल्या प्रथमेश ऊर्फ शंभु तोड वय २७ वर्षे रा. राजेंद्रनगर पी.एम.सी. कॉलनी, दत्तपाडी पुणे व अभिषेक शिर्डी रोकडे वय २२ वर्षे, रा.नांदेड गाव यांना अटक करण्यात यश आले आहे.
गुन्हेगारांच्या शोधांसाठी सीसीटीव्ही तपासूनही आरोपींचा माग लागत नव्हता. आरोपी इन्स्टाग्राम आणि व्हॉटस् अप वरून संपर्क करत असल्याने त्यांचा माग काढणे पोलिसांसाठी आव्हान ठरले. होते.
स्वारगेट पोलीस स्टेशन तपास पथकातील अधिकारी अंमलदार सलग १५ दिवस अहोरात्र चिकाटीने आरोपीचा शोध घेतला. पोलिस अंमलदार अनिस शेख, पोलिस अंमलदार शिवदत्त गायकवाड, पोलिस अंमलदार संदीप घुले, पोलिस अंमलदार फिरोज शेख व पोलिस अंमलदार सोमनाथ कांबळे यांना मिळालेल्या खबरीनुसार गुन्हयातील संशयित आरोपी रांजणगाव इथे येथे गेले आहेत. वरिष्ठांना माहिती दिल्यानंतर सापळा रचुन कारवाई करण्याचे आदेश दिले.
त्यानंतर प्रभारी अधिकारी सहायक पोलिस निरीक्षक प्रशांत सदे आणि पोलिस उपनिरीक्षक अशोक येवले अशी दोन पथके तयार करून सदे यांचे पथक रांजणगाव इथे रवाना झाले तर येवले यांचे पथक पुण्यातल्या धायरी भागात सापळा रचून थांबले होते. लोणीकंद जवळ पेरणेफाटा इथे संशयित आरोपी थांबले असल्याची खबर मिळाली. पोलिसांना पाहून पळून जाणाऱ्या आरोपींना पोलिसांनी शिताफीने जेरबंद केले.
आरोपींकडे चौकशी केली असता, हा गुन्हा त्यांनी इतर साथीदारांबरोबर मिळून केल्याची कबुली दिली. त्यानंतर पोलिस उपनिरीक्षक अशोक येवले, पोलिस अंमलदार दीपक खेंदाड, सुजय पवार, प्रवीण गोडसे व रमेश चव्हाण यांनी धायरी, नांदेडगाव इथे सापळा लावून 4 संशयित आरोपींना अटक केली. त्यांच्याकडून गुन्ह्यात सक्रीय सहभाग असल्याचेही चौकशीत निष्पन्न झाले आहे.
या गुन्हेगारांकडून 3 दुचाकी गाड्या, पिस्तुल, कोयते व मोबाईल फोन हे गुन्ह्यात वापरलेला मुद्देमाल जप्त करण्यात आला. हा गुन्हा जमिनीच्या आर्थिक व्यवहारातून सुपारी घेऊन घडला असल्याचे प्रथमदर्शनी तपासातून उघड झाले आहे. सदर गुन्ह्यातले आरोपी हे अभिलेखावरील आरोपी असून ते सराईत गुन्हेगार असून घातक हत्यारानिशी वावरत असल्याचे निष्पन्न जाले आहे.
स्वारगेट पोलिसांनी वरील कामगिरी पुणे शहर पोलीस आयुक्त रितेश कुमार, पुणे शहराचे पोलीस सह आयुक्त संदीप कर्णिक, पुणे शहर पश्चिम प्रादेशिक विभागाचे अपर पोलीस आयुक्त प्रदिकुमार पाटील, परिमंडल-२, पुणे शहरच्या पोलीस उप-आयुक्त स्मार्तना पाटील, स्वारगेट विभाग, पुणे शहर सहा पोलीस आयुक्त नारायण शिरगावकर यांच्या मार्गदर्शनाखाली स्वारगेट पोलीस स्टेशनचे माजी वरिष्ठ पोलीस निरीक्षक अशोक इंदलकर व प्रभारी वरिष्ठ पोजान निरीक्षक सुनिल झावरे, पोलीस निरीक्षक (गुन्हे) सोमनाथ सानप यांच्या आदेशान्वये तपास पथकातील सहा पोलीस निरीक्षक प्रशांत संदे, पोलीस उपनिरीक्षक अशोक येवले पोलिस हवालदार मुकुंद तारू, पोलिस शिपाई सोमनाथ कांबळे, शिवा गायकवाड़, फिरोज शेख, रमेश चव्हाण, संदीप पुले अनिस शेख, दीपक खेदार, सुजय पवार, गोडसे यांनी एकत्रितपणे ही कारवाई केली.
आरोपींनी या हल्ल्यापुर्वीही दिनांक 27 मे रोजी रात्रीच्या सात वाजता फिर्यादी दुचाकीवरून घरी जात असताना त्यांना दोन दुचाकीवरून आलेल्या गुन्हेगारांनी अडवले. फिर्यादीच्या अंगावर मिरची पावडर फेकून कोयत्याने वार केला. मात्र ते वार चुकवून पळून गेले होते.














