महाराष्ट्र न्युज नेटवर्क
बार्शी : येथील लायन्स क्लब बार्शी टाऊन, तेजस्विनी क्लब आणि लिओ क्लब च्या विविध पदांच्या उमेदवारांचा पदग्रहण समारंभ दिमाखात पार पडला.
या साठी इंडक्शन ऑफिसर म्हणून उपप्रांतपाल एम के पाटील व इंस्टॉलिंग ऑफीसर माजी प्रांतपाल बी एल जोशी होते.
तसेच प्रमुख उपस्थिती रिजन चेअरमन ला. राजेंद्र कासवा झोन चेअरमन ला प्रकाश फुरडे तसेच लिओ डिस्ट्रिक्ट प्रेसिडेंट लिओ पवन उर्फ शुभम श्रीश्रीमाळ उपस्थित होते. लायन्स क्लब बार्शी टाऊन च्या अध्यक्षपदी डॉ. योगेश कुलकर्णी, सचिव पदी हिम्मत भानुशाली, खजिनदार निखिल सरवदे यांनी पदभार स्विकारला, तेजस्विनीच्या अध्यक्षपदी प्राध्यापक अर्चना आवटे, सचिव म्हणून जयश्री ढगे, खजिनदार सोनाली कस्पटे यांनी पदभार स्विकारला. लिओ क्लबच्या अध्यक्षपदी लिओ आदित्य सोनिग्रा, सचिव म्हणून लिओ यश कुंकुलोळ, खजिनदारपदी लिओ मित परमार यांनी पदभार स्विकारला.
या प्रसंगी तीन क्लबचे मावळते पदाधिकारी ज्यामध्ये अमित कटारिया, योगिता कटारिया, लिओ यश मेहता. तसेच अतुल सोनिग्रा, वासुदेव ढगे, रवीप्रकाश बजाज, रवी राऊत, महावीर कदम, डॉ. हरिश कुलकर्णी, शंभुलाल भानुशाली, संताजी सावंत, आदित्य कोठारी व बार्शीतील प्रतिष्ठित नागरिक उपस्थित होते. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन लायन विनोद बुडुख आणि लायन वैभवी बुडुख यांनी केले तर आभार प्रदर्शन हिंमत भानुशाली यांनी केले.
