सहा महिन्यांपासून फरार आरोपीला अटकेची पोलिसांची कामगिरी
महाराष्ट्र न्युज नेटवर्क
पुणे : महाराष्ट्र संघटित गुन्हेगारी नियंत्रण कायद्यांतर्गत पोलिसांना हवा असलेला प्रमुख आरोपी चुहा गँगचा सूत्रधार साकीब मेहबुब चौधरी उर्फ लतीफ बागवान वय वर्ष 23, रा. लुनिया बिल्डिंग, कात्रज याला अटक कऱण्यात आली आहे. गेल्या 16 फेब्रुवारीपासून हा फरार होता.
कात्रज परिसरात गुन्हा केल्यानंतर तो फरार होता, मात्र त्याने कात्रज व संतोष नगर परिसरात स्वतःची टोळी करून दहशत निर्माण कऱण्याचा प्रयत्न चालवला होता.
फरारी असताना विविध जिल्ह्यांमध्ये ओळख, जागा बदलून वावरत होता. आरोपी साकीब चौधरी उर्फ लतिफ बागवान वर यापुर्वीही मोका कायद्यान्वये कारवाई करण्यात आली होती. त्यातून जामीन मिळाल्यानंतर पुन्हा कात्रज भागात वर्चस्व प्रस्थापित करण्यासाठी पुन्हा टोळी उभारली. टोळीचे वर्चस्व या भागात प्रस्थापित करण्यासाठी या भागात शिक्षण घेणाऱ्या बालकांचा वापर करत असे. भारती विद्यापीठ पोलिस स्टेशनच्या तपास पथकाचे अधिकारी व अंमलदार यांनी गुप्त स्रोतांचे जाळे सक्रीय करून तांत्रिक विश्लेषणावरून शोध घेतला.
पोलीस अंमलदार विक्रम सावंत, अभिजीत जाधव, निलेश ढमढेरे यांना आरोपी साकीय मेहबुब चौधरी ऊर्फ लतिफ बागवान, हा पुणे जिल्ह्यात पुरंदर तालुक्यातल्या निरा तालुक्यात राहात असल्याची खात्रीशीर माहिती मिळाल्याने भारती विद्यापीठ पोलिसांच्या तपास पथकाने आरोपीला ताब्यात घेतले. व गुन्ह्याचे तपासअधिकारी नारायण शिरगावकर यांनी त्याला अटक केली. वरील कारवाई पुण्याच्या पश्चिम प्रादेशीक विभागाचे अपर पोलीस आयुक्त प्रविणकुमार पाटील, परिमंडळ 2 च्या पोलीस उप आयुक्त स्मार्तना पाटील, स्वारगेट विभागाचे सहाय्यक पोलीस आयुक्त नारायण शिरगावकर यांच्या मार्गदर्शनाखाली भारती विदयापीठ पोलीस स्टेशनचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक विजय कुंभार, तसेच पोलीस निरीक्षक (गुन्हे) विजय पुराणिक, सहाय्यक पोलीस निरीक्षक अमोल रसाळ, पोलीस उप निरीक्षक सागर भोसले, पोलीस अंमलदार विक्रम सावंत, अभिजीत जाधव, निलेश ढमढेरे, चेतन गोरे, मंगेश पवार, हर्षल शिंदे, अवधुत जमदाडे, सचिन सरपाले, धनाजी धोत्रे, सचिन गाडे, निलेश खैरमोडे, अभिनय चौधरी, अशिष गायकवाड, राहुल तांबे, यांच्या पथकाने केली.















