परिमंडळ 4 मधील 65 सराईत गुन्हेगारांच्या माहितीचे आदानप्रदान
महाराष्ट्र न्युज नेटवर्क
पुणे : शहर पोलिस आयुक्तालयांतर्गत परिमंडळ 4 मध्ये होणाऱ्या जबरी चोरीच्या घटनांना आळा बसावा यासाठी परिमंडळ चार अंतर्गत असलेल्या पोलिस स्टेशन मधील आरोपींची ओळख परेड घेण्यात आली.
येरवडा, विमानतळ, चंदननगर, लोणीकंद, विश्रांतवाडी, खडकी व चतुश्रृंगी या पोलिस स्टेशन्सच्या रेकॉर्डवरील आरोपींची तसेच त्यांच्या गुन्हा करण्याच्या पद्धतीची परिमंडळातील इतर पोलिस स्टेशन ना ओळख होण्यासाठी 65 सराईत गुन्हेगारांच्या माहितीचे आदान प्रदान करण्यात आले. आरोपींच्या गुन्ह्यांच्या पद्धतीची ओळख करून देण्यासाठी परिमंडळ 4 चे पोलिस उप आयुक्त शशिकांत बोराटे यांनी येरवडा पोलिस स्टेशन हद्दीतल्या रेकॉर्डवरील सर्व जबरी चोरी करणाऱ्या आरोपींची ओळख परेड घेतली.
यावेळी परिमंडळ 4 चे पोलिस उप आयुक्त शशिकांत बोराटे, येरवडा पोलिस स्टेशनचे वरिष्ठ पोलिस निरीक्षक बाळकृष्ण कदम, लोणीकंद पोलिस स्टेशनचे सहायक पोलिस निरीक्षक गजानन जाधव, विमानतळ पोलिस स्टेशनचे सहायक पोलिस निरीक्षक विजय चंदन, येरवडा पोलिस स्टेशनचे पोलिस उपनिरीक्षक अंकुश डोंबाळे, पोलिस उपनिरीक्षक रविंद्रकुमार वारंगुळे, विश्रांतवाडी पोलिस स्टेशनचे पोलिस उपनिरीक्षक लहु सातपुते, चतुश्रृंगी पोलिस स्टेशनचे पोलिस उपनिरीक्षक रुपेश चाळके, खडकी पोलिस स्टेशन चे पोलिस उपनिरीक्षक वैभव मगदुम, चंदननगर पोलिस स्टेशनचे पोलिस उपनिरिक्षक दिलीप पालवे असे सर्व पोलिस स्टेशनचे तपास पथकाचे प्रभारी अधिकारी उपस्थित होते. परिमंडळ-4 मध्ये अशा प्रकारे वेगवेगळ्या गुन्ह्यातील आरोपींचे आदानप्रदान कार्यक्रम नियमित सुरू राहाणार असल्याची माहिती परिमंडळ चारच्या पोलिस उपायुक्तांनी दिली आहे.