युनिट ६ गुन्हे शाखेची कारवाई
महाराष्ट्र न्यूज नेटवर्क : अभिजित डुंगरवाल
पुणे : महाराष्ट्रातील वेगवेगळया जिल्हयात दरोडा व घरफोड्या करणा-या आरोपीस गुन्हे शाखा युनिट-६ ला जेरबंद करण्यात यश मिळाले आहे. हंजराज ऊर्फ हंसु टाक (वय १८ वर्षे रा. तुळजाभवानी वसाहत गाडीतळ, हडपसर) याला ताब्यात घेण्यात आले.
आरोपीने सोन्याच्या दागिने तसेच रोख रक्कमेची घरफोडी चोरी केल्याची ठिकाणे दाखवून एकुण ६,१०,५०० रुपये किंमतीचे १११ ग्रॅम सोन्याचे दागिने असा मुद्देमाल काढून दिल्याने तो जप्त करण्यात आला आहे.
हडपसर पोलीस ठाणे येथे या गुन्हयाचा तपास युनिट-६, मार्फत चालू असताना नितिन मुंढे यांना माहिती मिळाली की, हा गुन्हा हंसराज टाक याने केला आहे. तो कॅनॉल रोड, हडपसर, येथे येणार आहे. ही माहिती मिळाल्याने वरिष्ठ पोलीस निरीक्षक, गुन्हे शाखा युनिट-६ चे रजनीश निर्मल, यांच्या आदेशानुसार युनिट कडील अधिकारी व अंमलदार यांनी सापळा रचला. गुन्हेगाराला शिताफीने पकडून त्याला ताब्यात घेतले. त्याला विश्वासात घेऊन गुन्हयाच्या अनुषंगाने तपास करता त्याने गुन्हा केल्याची कबुली दिली. त्याला अटक करुन त्याची पोलीस कस्टडीची रिमांड घेण्यात आली. त्यामध्ये एकुण ९ गुन्हे उघडकीस आले आहेत. आरोपीकडे तपास करता तो महाराष्ट्रातील गुन्हयातील पाहिजे आरोपी असल्याचे उघडकीस आले आहे. गुन्हयाचा तपास वरिष्ठ पोलीस निरीक्षक, गुन्हे शाखा युनिट ६ चे रजनीश निर्मल, यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस उपनिरीक्षक, गुन्हे शाखा युनिट-६ चे भैरवनाथ शेळके हे करीत आहेत.
ही कामगिरी पोलीस आयुक्त रितेश कुमार, पोलीस सहआयुक्त (अतिरिक्त कार्यभार) व अपर पोलीस आयुक्त, गुन्हे, रामनाथ पोकळे, पोलीस उप आयुक्त, अमोल झेंडे, सहायक पोलीस आयुक्त, गुन्हे २ चे सतिश गोवेकर, यांच्या मार्गदर्शनाखाली सुरेश जायभाय, अंमलदार विठ्ठल खेडकर, रमेश मेमाणे, बाळासाहेब सकटे, प्रतिक लाहीगुडे, कानिफनाथ कारखेले, ऋषिकेश व्यवहारे, ऋषीकेश ताकवणे, सचिन पवार, नितीन घाडगे, महेंद्र कडु, ज्योती काळे व सुहास तांबेकर यांनी केली आहे.