शासकीय कामात अडथळा आणल्याचा गुन्हा दाखल
महाराष्ट्र न्यूज नेटवर्क : पवन श्रीश्रीमाळ
बार्शी : बार्शी शहर पोलिस ठाण्यात येऊन एक व्यक्ती आरडाओरड करून गोंधळ करू लागला. दंगा करू नको असे समजावून सांगत असताना त्या व्यक्तीने पोलिसांकडे पाहून तुम्हास जास्त मस्ती आली, अशी धमकी देत पोलिसांची गच्चंडी पकडली तसेच अंगठा पिरगळून सरकारी कामात अडथळा निर्माण केल्याने त्याच्यावर गुन्हा दाखल करण्यात आला.
विनोद विक्रम जाधव (रा. अलीपूर रोड, बार्शी) असे गुन्हा दाखल केलेल्या आरोपीचे नाव आहे.
हा प्रकार रविवार दि. ७ जानेवारी रोजी रात्री होऊन याबाबत सहायक्क पोलिस निरीक्षक दिलीप ढेरे यांनी फिर्याद दिली आहे.
आरोपी हा शहर पोलिस स्टेशन येथे येऊन मोठमोठ्याने ओरडत गोंधळ घालू लागला. त्यावेळी त्याला समजावून सांगत असताना त्याने पोलिसांकडे बघून पोलिसांना जास्त मस्ती आली आहे, पोलिसांची कशी बदनामी करतो, असे म्हणून सहायक पोलिस निरीक्षक अंगठा पिरगळून दुखापत केली. दुसऱ्या हाताने गच्चंडी पकडून शिवीगाळ केली. त्याला ताब्यात घेण्यात आले आहे.
पुढील तपास पोलिस उपनिरीक्षक महेश गळगटे करत आहेत.
