महाराष्ट्र न्युज नेटवर्क : सुनीलकुमार डुंगरवाल
भुम: सांगोला येथे घेण्यात आलेल्या राज्यस्तरीय कबड्डी निवड चाचणीत भुम येथील पत्रकार प्रमोद कांबळे यांचे चिरंजीव कु. यशोदीप कांबळेची झारखंड येथे होणाऱ्या राष्ट्रीय कबड्डी स्पर्धेसाठी निवड झाली. याबद्दल शाळेच्या वतीने त्याचा व मार्गदर्शक प्रशिक्षक अमय सुपेकर (कबड्डी कोच), कमलाकर डोंबाळे यांचा सत्कार करण्यात आला. यावेळी कार्यक्रमास भूम शहराचे तहसीलदार सचिन खाडे, प्रमोद कांबळे, विवेक गुडूप, संस्थेचे सचिव आर. डी. सुळ, मुख्याध्यापक धनंजय पवार, खेळाडूंचे आधारवड उपमुख्याध्यापिका शर्मीला पाटील, पर्यवेक्षक लगाडे, रवींद्र प्राथमिकचे मुख्याध्यापक देशमुख यांनी अभिनंदन केले. यावेळी शिक्षक, शिक्षकेत्तर कर्मचारी विद्यार्थी मोठ्या संख्येने उपस्थित होते.















